💥परभणी जिल्हा विशेष पथकाने खंडोबा बाजारात शस्त्र हातात घेऊन दहशत माजवणारा 'मोका' तील आरोपी घेतला ताब्यात....!

 


💥नानलपेठ पोलिस स्थानकात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल💥

परभणी (दि.४ डिसेंबर) -जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील वाढत्या गून्हेगारीसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फैलावलेल्या अवैध धंद्यांच्या साम्राज्यास सुरुंग लावल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यातील गुन्हेगारीसह अवैध धंद्यांचा काळाकारभार उध्वस्त करुन संपूर्ण जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्थापण केलेल्या विशेष पथकाने एकामागून एक 


अत्यंत धाडसी व यशस्वी कारवाया करीत आपल्या कर्तृत्वाची छाप सोडण्याची मालिकाच जणूकाही सुरू केल्याचे निदर्शनास येत असून अशीच धाडसी कारवाई करीत विशेष पथकाने काल गुरूवार  दि.३ डिसेंबर २०२० रोजी रात्री उशीरा ९-३० वाजेच्या सुमारास विशेष पथकाचे पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार व सहकारी कर्मचारी यशवंत वाघमारे यांना पेट्रोलींग करतेवेळी शहरातील खंडोबा बाजार परिसरात हाताच धारदार तलवार व हुबेहूब खऱ्या पिस्टल सारखी पिस्टल हातात घेऊन परिसरात मोठमोठ्याने आवाज काढून सिनेस्टाईल पध्दतीत लोकांमध्ये दहशत माजवतांना 'मोका' कायद्यातून नुकताच जामीनावर सुटलेला आरोपी मनोज भगवान पंडीत रा.साई नगर परभणी हा दिसला त्यांनी तात्काळ पथकातील अन्य सहकारी कर्मचाऱ्यांना बोलावून त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर शहरातील नानलपेठ पोलिस स्थानकात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून यावेळी विशेष पथकाचे पथक पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार,विश्वास खोले ,सोबत पोलीस कर्मचारि सुग्रीव केंद्रे,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने,शंकर गायकवाड़,विष्णु भिसे,दिपक मुदिराज यांनी केलेल्या या धाडसी कारवाई संदर्भात पथकाचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीणा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक श्री मुमका सुदर्शन यानी अभिनंदन केले आहे..

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या