💥पुर्णा पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार; पाण्या अभावी बागायतदार शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे होत आहे नुकसान...!

 


💥मनसेने प्रभारी शाखाधिकाऱ्यांच्या मार्फत पाटबंधारे विभाग वसमतच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले फेर निवेदन💥

पुर्णा (दि.१५ डिसेंबर) - तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्या अभावी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यास सर्वस्वी पुर्णा पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार जवाबदार असल्याने आज मंगळवार दि.१५ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख (सोनटक्के) यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाने पुर्णा पाटबंधारे विभागाच्या वसमत येथील कार्यकारी अभियंत्यास प्रभारी शाखा अधिकारी यांच्यामार्फत फेर निवेदन देऊन तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली.

तालुक्यातील चुडावा,पिंपळा,भत्या,आलेगाव ,कलमुला आदी गावांतील बागायतदार शेतकऱ्यांना (टेल )शेवट पर्यंत अद्याप पाणी पोहोचत नसल्याचे कारणामुळे पूर्णा पाटबंधारे विभाग लिंबगाव कार्यालता आज मंगळवारी प्रभारी शाखा अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने फेर निवेदन देण्यात आले मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांच्याषनेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनावर चुडावा येथील युवा शेतकरी नेते प्रेम देसाई,संतोष देसाई ,आत्माराम देसाई ,गणेश देसाई ,रोहिदास राव देसाई,नामदेव देसाई यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी निवेदनावर स्वाक्षरी केल्या आहेत या वेळी प्रभारी शाखा अधिकारी यांना निवेदन देते वेळी मनसे जिल्हाध्यक्ष सोनटक्के व उपस्थित शेतकऱ्यांनी पुर्णा पातबंधारे विभागाच्या लिंबगाव शाखेतील प्रभारी शाखा यांना तिव्र संताप व्यक्त करीत असा इशारा दिला की शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी न पोहोचल्यास आम्ही रस्त्यावर उतरू या नंतरची सर्वस्वी जवाबदारी पाटबंधारे विभागाची राहिल त्यावर  प्रभारी शाखाधिकारी प्रभाकर मैड यांनी उपस्थित मनसे जिल्हाध्यक्ष सोनटक्के व शेतकऱ्यांना असे आश्वासन दिले की शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत शंभर टक्के पाणी पोहोचवण्याचे काम आम्ही पुर्ण करू त्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून उपस्थित मनसे नेते व शेतकऱ्यांनी येत्या दोन दिवस आम्ही पाणी मिळण्याची प्रतीक्षा करू यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असे म्हणून शेतकरी आपल्या गावी चुडावा येते परत आले असले तरी पाटबंधारे विभागाचे अधिकारी खरोखरच शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत येत्या दोन दिवसात पाणी पोहोचवण्याच्या दिशेनं पावल उचलतील काय ?असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या