💥ऑल इंडिया एंटी करप्शन एंटी क्राईम सेल तर्फे महापुरूष संत बाबा बलविंदरसिंघ सह ५ मान्यवरांचा सन्मान...!


💥नांदेड मध्ये संत बाबा बलविंदरसिंघजी यांना सन्मानपत्र प्रदान 💥


नांदेड (दि.१९ डिसेंबर) कोरोना संक्रमण महामारीच्या काळात लाखों लोकांना 'गुरू का लंगर' प्रसाद म्हणून अन्नदान करणारे तसेच ग्रीन सिटी प्रकल्प राबवून नांदेड परिसर हरितक्रांति घडवून आणणारे सेवाभावी व्यक्तिमत्व, दसमपिता साहीब श्री.गुरू गोबिंदसिंघजी महाराज यांच्या चरण कमलांनी पावन झालेली पावनभुमी श्री.हुजूर साहीब नांदेड नगरीतील गुरूद्वारा श्री लंगर साहिबचे मुखी महापुरूष संत बाबा नरींदरसिंघजी कारसेवावाले व नांदेड भूषण महान संत महापुरूष बाबा बलविंदरसिंघजी या संत महापुरूषांसह तसेच जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार तथा समाजसेवक, साहित्यिक सरदार रविंदरसिंघजी मोदी,परभणी जिल्ह्यातील उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष तथा जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स या वेब वृत्तवाहिणीचे संपादक/संचालक दिनेश चौधरी, तसेच ई-टिव्ही भारत या वृत्तवाहिनीचे परभणी जिल्हा प्रतिनिधी गिरीराज भगत या महाराष्ट्रातील दोन महान संत महापुरूषांसह तीन पत्रकारांचा सहारणपूर उत्तर प्रदेशस्थित राष्ट्रीय सामाजिक संस्था असलेल्या ऑल इंडिया एंटी करप्शन अँड एंटी क्राइम सेल या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री.जी.एस.बब्बर यांनी विशेष दखल घेऊन कोरोना संक्रमण आपत्तिकाळात सेवा बजावल्या बद्दल शुक्रवार दि.१८ डिसेंबर २०२० रोजी नांदेड येथील श्री गुरू रामदासजी एन.आर.आय. यात्री निवासस्थानात प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री जी.एस.बब्बर यांनी हजूर साहेब येथील संत आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीमत्वांचे सत्कार करतांना आनंद होत आहे अशी भावना भ्रमणध्वनीवरून बोलतांना व्यक्त केली. या सत्कार सोहळ्या प्रसंगी सत्कारमुर्ती संत बाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, सरदार रविंदरसिंघ मोदी, पत्रकार दिनेश चौधरी यांच्यासह यावेळी आवर्जून उपस्थित असलेले हॉकीचे कोच तथा सामाजिक क्षेत्रात सदैव कार्यरत राहणारे सरदार हरदयालसिंघ संधू, प्रतिष्ठित व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते सरदार गुरदयालसिंघ सिध्दू, प्रतिष्ठित व्यापारी तथा समाजसेवक सरदार परशनसिंघ नेहंग,दै.सत्यलेख वृत्तपत्राचे पुर्णा ग्रामीण प्रतिनिधी रामा पारवे, कैलास पिडगे, मंगेश पारवे, प्रफुल्ल कराळे, नागेश पिडगे, शिराज शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 


संतबाबा बलविंदरसिंघ जी यांनी सम्मान स्वीकारल्या नंतर ऑल इंडिया एंटी करप्शन एंटी क्राइम सेल संघटनेचे आभार व्यक्त केले. वाहेगुरु परमात्मा आमच्या कडून सर्व करवून घेत आहे. मानव सेवा, श्रेष्ठ आहे. आपात वेळी सामाजिक संघटनांनी आपले कर्तव्य पार पडावे असे ही बाबाजी म्हणाले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या