💥परभणी येथील दत्तनगर परिसरात प्लॉट घेऊन देतो असे म्हणून आर्थिक फसवणूक करणारा पोलिस कर्मचारी अखेर निलंबित....!


💥आर्थिक फसवणूकीसह ४ महिन्यांपासून कर्तव्यावर गैरहजर राहणे ही पडले महागात जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केले निलंबीत💥

परभणी (दि.३० डिसेंबर) - शहरातील दत्तनगर परिसरात प्लॉट घेऊन देतो असे म्हणून धनादेशाव्दारे ९० हजार रुपये घेऊनही प्लॉट घेऊन देणे तर सोडाच उलट घेतलेली रक्कम सुध्दा परत न देता फसवणूक करणार्‍या तसेच मागील ४ महिन्यांपासून सातत्याने कर्तव्यावर गैरहजर असलेल्या एका पोलिस कर्मचार्‍यास जिल्ह्याचे कर्तव्यकठोर व शिस्तप्रिय जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी आज बुधवार दि.३० डिसेंबर २०२० रोजी तडकाफडकी निलंबित केले.

परभणी शहरातील दत्तनगर परिसरामध्ये प्लॉट घेऊन देतो असे म्हणून मागील दीड वर्षापूर्वी पोलिस शिपाई विनायक भोपळे या कर्मचाऱ्याने परजिल्ह्यातील एका व्यक्तीकडून २ जून २०१९ रोजी ९० हजार रुपयांचा धनादेश घेतला. तो धनादेश स्वतःच्या बँकेच्या खात्यावरून वठवून घेतला. ९० हजार रुपये प्लॉट घेऊन देतो म्हणून भोपळे यांनी घेतले. मात्र मागील दिड वर्षाचा कालावधी होऊनही त्यांनी संबंधितास दत्तनगरमध्ये प्लॉट घेऊन दिला नाही. शिवाय, चाल-ढकल करीत रक्कमही परत केली नाही परिणामी त्या व्यक्तीस आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले शिवाय पोलिस शिपाई भोपळेने दि.१७ ऑगस्ट २०२० पासून कर्तव्यावर अनधिकृतपणे गैरहजर असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे जबाबदार, कर्तव्यनिष्ठ पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असतानाही सर्वसामान्य जनतेची फसवणूक होणार नाही असे अपेक्षित असताना भोपळे यांनी जाणीवपूर्वक फसवणूक करून गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करीत पोलिस दलाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे नमूद करीत जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी आज बुधवारी भोपळे या कर्मचाऱ्याला सेवेनतून निलंबित केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या