💥पुर्णा तालुक्यातील गौर शिवारात सामाईक शेतधुऱ्याच्या पाऊल वाटेवरून जाण्यास मज्जाव करीत तिघांना गंभीर मारहाण....!

 


💥तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकात दोन जनांच्या विरोधात गुन्हा दाखल💥 

पुर्णा (दि.७ डिसेंबर) - तालुक्यातील गौर शिवारात शेताच्या सामाईक धुऱ्याच्या पाऊल वाटेवरून जाण्यास मज्जाव करीत शेजारील शेतकऱ्यासह सोबतच्या दोघांना धारदार विळा व खोऱ्याने गंभीर मारहाण केल्याची घटना काल रविवार दि.६ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ११-५० वाजेच्या सुमारास घडली असून या घटने संदर्भात चुडावा पोलिस स्थानकात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सविस्तर वृत्त असेकी तालुक्यातील गौर शिवारात गंगाधर विश्वनाथ जोगदंड व नारायन सोनटक्के यांचे शेत एकमेकांना लागून असल्याने दोघांचा सामुईक धुरा असून या धुऱ्याच्या पाऊल वाटेवरून नारायन सोनटक्के यांना त्यांच्या शेतात जाण्याची वाट आहे काल रविवारी ते नेहमी प्रमाणे आपल्या शेतात सोबत दिपक आणि पवन यांच्यासह जात असतांना शेजारील गंगाधर विश्वनाथ जोगदंड व विश्वनाथ दत्ता जोगदंड यांनी संगणमत करून दुपारच्या सुमारास त्यांना अडवून अडवून धुऱ्याच्या पाऊल वाटवरून"  जाण्यास मज्जाव करीत आरोपी गंगाधर जोगंदंड याने फिर्यादी नारायन सोनटक्के यास शिवीगाळ करून धारदार विळ्याने नाकावर भोवईवर व डोळ्याखाली मारून गंभीर जखमी केले तर विश्वनाथ दत्ता जोगदंड याने सोबतचे साक्षिदार दिपक यास खोऱ्याने डोक्यात मारून जख्मी करुन लाथा बुक्यांनी मारहाण केली यावेळी सोबत असलेल्या पवन यासही आरोपी विश्वनाथ जोगदंड याने खोऱ्याचे दांड्याने व लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण केली या संदर्भात फिर्यादी नारायन अर्जुन सोनटक्के यांनी चुडावा पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी गंगाधर विश्वनाथ जोगदंड व विश्वनाथ दत्ता जोगदंड यांच्या विरोधात गुरनं.१३२/२०२० कलम ३२४,३२३,५०४,५०६ ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.केजगीर हे करीत आहेत....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या