💥परभणी जिल्ह्यात आढळले आज गुरूवारी २४ कोरोना बाधीत रुग्ण....!


💥जिल्ह्यात आजपर्यंत आढळले एकून ७ हजार ४२८ कोरोना बाधीत रुग्ण💥

परभणी (दि.१७ डिसेंबर) - शहरासह जिल्ह्यात आज गुरुवार दि.१७ डिसेंबर २०२० रोजी २४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज रुग्णालयात यशस्वी उपचार घेऊन बरे झालेल्य एकून १२ कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालय प्रशासनाकडून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

कोविड कक्षात भरती एकून रुग्ण १२२ असून जिल्ह्यात आजपर्यंत २९७ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार ४२८ कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून ७ हजार ९कोरोनामुक्त व्यक्तींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या