💥पुर्णा शहरात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; एका महिन्यात दोन मोटार सायकल गेल्या चोरीस...!


💥तालुक्यात वाहन चोरट्यांची टोळी सक्रीय झाल्याचा व्यक्त होत आहे अंदाज💥

पुर्णा (दि.१२ डिसेंबर) - पुर्णा तालुक्यात वाहन चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे निदर्शनास येत असून मागील महिण्यात दि.१५ नोव्हेंबर २०२० रोजी पुर्णा-ताडकळस राज्यमार्गावरील बॉम्बे ब्रिज वरून टिव्हीएस कंपनीची अपाची-१६० सिसी ही मोटार सायकल चोरीस गेल्याच्या घटनेला एक महिना सुध्दा उलटत नाही तोच आज शनिवार दि.१२ डिसेंबर २०२० रोजी शहरातील बसस्थानक परिसरातून सकाळी १०-०० वाज्या सुमारास तालुक्यातील गौर येथील रहिवासी असलेल्या सोपान आनंदराव जोगदंड यांची स्प्लेंडर होंडा मोटर सायकल क्र.एमएच-२२ एएल ९८१९ ही मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली असून शहरात मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने  दुचाकी वाहन चोरीच्या घटना घडत असल्यामुळे वाहन धारकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील नोव्हेंबर महिण्यात पुर्णा-ताडकळस राज्यमार्गावरील बॉम्बे ब्रिज वरून एकामागून एक दोन दुचाकी मोटरसायकल चोरीच्या घटनांचा तपास लागत नाही तोच पुन्हा शहरातील बसस्थानक परिसरातून आज शनिवारी स्प्लेंडर होंडा मोटार सायकल चोरीस गेल्याने तालुक्यात वाहन चोरट्यांनी आपले पाय पसरण्यास सुरुवात केल्याचे दिसत असून आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या