💥पुर्णा तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीत अवैध गौण-खनिज तस्करांचा धुमाकूळ....!


💥चुडावा-वसमत,फाटा,चुडावा-कावलगाव,चुडावा-नांदेड,धनगर-गौर-चुडावा मार्गाने असंख्य वाहनांतून होतेय रेती तस्करी💥

💥ग्रामीण प्रतिनिधी - रामा पारवे


पुर्णा (दि.१५ डिसेंबर) तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात असंख्य वाहनांतून गौण-खनिज रेती-मुरूम-मातीची (सनवट) तस्करी होत असल्याचे निदर्शनास येत असून या अवैध रेती मुरूम माती तस्करांवर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांसह परिसरातील शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना आपला जिव धोक्यात घालून जगावे लागत असून चुडावा पोलिस प्रशासनाने चुडावा नांदेड मार्गावरील वसमत फाट्यावर उभारलेली चेकपोष्ट अवैध रेती तस्करी,अवैध गुटखा तस्करी,अवैध देशी-विदेशी,अवैध गो-गोवंश तस्करी करणारी वाहन तपासून कारवाई करण्यासाठी उभारलेली आहे की अवैध व्यवसाईकांकडून वसुली करण्यासाठी ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून सदरील चेकपोष्टला लागूनच एक धाबा चालत असल्याने शंकेची पाल चुकचूकतांना दिसत आहे.

तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील धनगर टाकळी,लिखा पिंपळगाव (गंगाजी बापू),कंठेश्वर,रुंज आदी गावांतून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या असंख्य ताफ्यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन करून त्या चोरट्या रेतीची टिप्पर-ट्रेक्टर द्वारे तस्करी केल्या जात असतांना महसुल प्रशासनासह चुडावा पोलिस प्रशासन ही अवैध गौण-खनिज रेती-माती-मुरूम तस्करांनी हितसंबंध जोपासत या तस्करांना सोईस्कररित्या प्रोत्साहन देत असल्यामुळे या परिसरातील सर्वसामान्य जनता अक्षरशः त्रस्त झाल्याचे निदर्शनास येत असून या अवैध गौण खनिज रेतीसह माती मुरूमाची तस्करी शेजारी नांदेड-हिंगोली जिल्ह्यात होतांना दिसत असून परिसरातील चुडावा-वसमत,फाटा,चुडावा-कावलगाव,चुडावा-नांदेड,धनगर टाकळी-गौर-चुडावा मार्गाने असंख्य वाहनांतून रात्रंदिवस शासकीय गौण-खनिजाची तस्करी होत असतांना मात्र चुडावा पोलिस स्थानकाचे सपोनि.देवकते मात्र सोईस्कररित्या हितसंबंधासह सोयरसंबंध जोपासत शासकीय गौण-खनिजासह परिसरातून होणाऱ्या अवैध गुटखा तस्करी,अवैध देशी-विदेशी दारूच्या तस्करी विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या