💥धनगर साम्राज्य सेनेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त केले अभिवादन...!


💥डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले💥

गंगाखेड (दि.६ डिसेंबर) - भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त गंगाखेड येथे रविवारी अभिवादन करण्यात आले

शहरातील मुख्य चौक असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर ,राजे मल्हार मित्र मंडळाचे अध्यक्ष नारायणराव धनवटे, ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष सोपानराव टोले, आरोग्य सेवक सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या