💥परभणी जिल्ह्यातील पाथरीत विशेष पथकाने टाकली अवैध गुटखा विक्रेत्याच्या घरावर धाड...!


💥पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त💥 

परभणी (दि.५ डिसेंबर) - राज्यात बंदी असलेला विषारी अवैध गुटखा तंबाखूजन्य पदार्थाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्रीसह गुटखा तस्करी सुध्दा होत असल्याची गंभीर बाब जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंता मिना यांच्या निदर्शनास आल्याने त्यांच्या आदेशानुसार विशेष पथक अवैध गुटखा तस्करीसह मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा तस्करांच्या विरोधात कमालीचे सक्रीय झाल्याचे दिसत असून विशेष पथकाने काल शुक्रवार दि.४ डिसेंबर २०२० रोजी रात्री १०-०० वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील पाथरी शहरातल्या मुर्तुजा कॉलनी परिसरात राहणाऱ्या नशीर उर्फ पप्पु बाबु अन्सारी याच्या घरावर धाड टाकून अवैध गोवा गुटख्याचा तब्बल ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची धाडसी कारवाई केली असून संबंधित आरोपीने स्वतःच्या राहत्या घरात विक्रीसाठी साठवलेल्या अवैध विषारी गुटख्यामुळे मनुष्यास कर्करोगासारखे दुर्धर आजार होतात असे माहीत आसुन सुध्दा व जनहितास घातक आसलेला हा गुटखा साठा साठवुन ठेवल्याचे आढळून आल्याने मोबाईलसह तब्बल ४ लाख ६० हजार रुपयांचा अवैध गुटखा साठा जप्त करीत विशेष पथकातील पोहेकॉ.सुग्रीव किशनराव केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी नशीर उर्फ पप्पु बाबु आन्सारी वय २८ वर्ष रा.मुर्तुजा काॅलनी  पाथरी,वाजेद मुन्ना अन्सारी वय ३७ वर्ष रा साईरोड पाथरी,आवेज खाॅन आलिदात खाॅन पठाण वय २९ वर्ष रा.पठाण मोहल्ला पाथरी यांच्या विरोधात पाथरी पोलिस स्थानकात  गुरनं. ४७८/२०२० कलम ३२८,२७२,२७३,१८८,१२० (ब) ३४ भादवीसह २६ (२) (व्ही),२७ (२) (ई),३० (२) (ए),५९,अन्न सुरक्षा आणी मानके अधिनीयम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथरी पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरिक्षक आहिरे हे करीत असून सदरील अवैध गुटखा विरोधात धाडसी कारवाई करणाऱ्या विशेष पथकातील पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार,विश्वास खोले यांच्यासह पथकातील पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने,शंकर गायकवाड़,अजहर पटेल,विष्णु भिसे ,दिपक मुदिराज यांचे पोलिस अधीक्षक जयंत मीणा आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री मुमका सुदर्शन यानी अभिनंदन केले आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या