💥पुर्णा शहरातील अभिनव विद्या विहार शाळा परिसरात घडलेल्या निर्घृण हत्या प्रकरणातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात...!


💥सपोनि.प्रविण धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील धाडसी पथकाने मोहोळ जि.सोलापूर फरार आरोपीस घेतले ताब्यात💥

पूर्णा (दि.१२ डिसेंबर) शहरातील पुर्णा-चुडावा मार्गावरील अभिनव विद्या विहार प्रशाला या शाळेच्या परिसरात परिसरात मागील ३ महिन्यापूर्वी पाल मांडून राहणाऱ्या पार्धी समाजाच्या वसाहतीत झालेल्या एका  निर्घृण हत्येच्या प्रकरणातील आरोपीस आज दि.१२ डिसेंबर २०२० रोजी पूर्णा पोलिसांनी ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई केली आहे.     मागील ३ महिण्यापूर्वी सप्टेंबर महिन्यात शहरातील पुर्णा-चुडावा मार्गावरील अभिनव विहार प्रशाला या शाळा परिसरातील मोकळ्या जागेत पाल मांडून राहणाऱ्या पार्धी समाजाच्या झोपडपट्टी वस्तीमध्ये आपापसातील घरगूती वादामुळे सिद्धार्थ किशन गायकवाड नामक २५ वर्षीय युवकाचा अत्यंत क्रुरपणे तिष्ण शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती या हत्ये प्रकरणी मयत सिध्दार्य या तरुणाचे वडिल किशन गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ जिल्हा सोलापूर येथील शेषा चपरू काळे,अशोक चपरू काळे,सनीदेवल सुरेश काळे,सिद्धप्पा चपरू काळे या चार आरोपीं विरोधात पूर्णा पोलिस स्थानकात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

 या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर यातील फरार झालेल्या आरोपी पैकी अशोक चपरू काळे यास पोलिसांनी अटक केली होती परंतु अद्यापही ३ आरोपी फरार होते.गुप्त खबऱ्या कडून या घटनेचे धाडसी व कर्तव्यनिष्ठ तपास अधिकारी (आयओ) सपोनि.प्रविण धुमाळ यांना माहिती मिळाली की यातील तिघांपैकी अशोक चपरू काळे हा मोहोळ जि.सोलापूर येथे आला आहे. माहिती मिळताच तापसाधिकारी सपोनि प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी भोसले,हेकॉ.पुणेकर,टेकाळे यांनी मोहोळ गाठून  शनिवारी मोहोळ पोलिस प्रशासनाच्या मदतीने आरोपी सिद्धप्पा काळे यास ताब्यात घेण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या