💥पुर्णा शहरातील मस्तानपूरा नई आबादी परिसरातील निकृष्ट रस्त्यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी...!

 


💥नगर परिषदेचे मुख्याधिकारी पाटील यांना परिसरातील नागरिक शेख जमील शेख इब्राहीम यांनी दिले निवेदन💥

पुर्णा (दि.४ डिसेंबर)- शहरातील मस्तानपूरा नई आबादी परिसरात शेख शफ्फो शेख महेबूबा यांच्या घरापासून ते शेख इस्माईल यांच्या घरा पर्यंत नगर परिषद प्रशासनाकडून होत असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने होत असून सदरील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी अतिशय हलक्या दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याने सदरील काम अत्यंत दर्जाहीन होत असल्याने या निकृष्ट कामाची चौकशी करून गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शेख जमील शेख इब्राहीम यांनी एका निवेदनाद्वारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्याकडे केली असून या निवेदनावर मुख्याधिकारी पाटील हे काय कारवाई करतात याकडे संपूर्ण शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या