💥काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन...!


💥प्रकृती अस्वास्थ्यामुळे फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल💥

नवी दिल्ली, दि.२१ : ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. दिल्लीच्या फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी रात्री मोतीलाल व्होरा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल केले होते. इस्पितळात दाखल झाल्यानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही.

मोतीलाल व्होरा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले आहेत. गांधी घराण्याचे सर्वात जवळचे नेते मानले जात . ते बराच काळ काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते. त्यानंतर २०१८ मध्ये व्होरा यांना अहमद पटेल यांच्याकडील कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अहमद पटेल यांचेही नुकतेच निधन झालेले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह इतर अनेक काँग्रेस नेत्यांनी मोतीलाल व्होरा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले की, व्होराजी निष्ठावंत व्यक्ती होते. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या