💥पुर्णेत युवा सेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद...!


💥महारक्तदान शिबिरात १०० रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग💥

पूर्णा (दि.२१ डिसेंबर) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले.यानुसार शिवसेना युवासेनेच्या वतीने सोमवारी २१ रोजी पुर्णा शहरात छत्रपती संभाजी महाराज चौकात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.याकार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थितीत युवासेनेचे जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप काळे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कदम म्हणाले की, संकट कोणतीही असो ऐंशी टक्के समाजकारण विस टक्के राजकारण यानुसार शिवसेना युवासेना जनसामान्यांना आधार देण्यासाठी सदैव तत्पर असते.कोरोना काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्य भरात रक्तदान शिबीराचे आयोजन सुरू असुन परभणी जिल्ह्यातुन हजारो बाॅटल रक्त संकलीत केले जात आहे.कार्यक्रमास शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम,मा.नगरसेवक संतोष एकलारे, साहेबराव कदम, नगरसेवक श्याम कदम, अँड राजेश भालेराव, नितीन उर्फ बंटी कदम, गजानन सवराते, सुनिल कदम यांची उपस्थिती होती.नांदेड येथिल हुजुर साहेब रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलण करण्यात आले. यावेळी १०० रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला. सर्वाना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवासेना तालुका प्रमुख बंडु अप्पा बनसोडे, शहरप्रमुख विकास वैजवाडे,विद्यानंद तेजबंद,कालीदास वैद्य,आदींनी परिश्रम घेतले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या