💥पुर्णा शहरातील जुना मोंढा परिसरात मिलन नाईट मटका जुगार घेणाऱ्या एकास पोलिस प्रशासनाने घेतले ताब्यात...!


💥पोलिस प्रशासनाने केलेल्या कारवाईत १४४०/-रुपयांच्या नगदी रक्कम तसेच मटका जुगार साहित्यासह मोबाईल हस्तगत💥

पुर्णा (दि.१३ डिसेंबर) शहरातील जुना मोंढा परिसरात स्वतःच्या फायद्यासाठी मिलन नाईट मटका जुगार चालवून लोकांकडून पैसे घेऊन चिठ्ठ्या देणाऱ्या एकास काल शनिवार दि.१२ डिसेंबर २०२० रोजी सायं.६-०० वाजेच्या सुमारास कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रविण धुमाळ यांच्या मार्गदर्शना खाली हेकॉ. समीर अख्तर पठाण  यांनी आरोपी नारायन कऱ्हाळे वय वर्षे ६० यास ताब्यात घेऊन त्याच्या कडून नगदी १४४० रुपयांसह एक मोबाईल व जुगार साहित्य जप्त केले असून नमूद आरोपी नारायन कऱ्हाळे विरोधात फिर्यादी समीर अख्तर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पुर्णा पोलिस स्थानकात गुरनं.३६७/२०२० कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे...टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या