💥केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर पुर्णा तालुक्यात चोख बंदोबस्त...!


💥डिवायएसपी सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शखाली कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास पोलिस प्रशासन सक्षम💥

पुर्णा (दि.८ डिसेंबर) - संपूर्ण देशासह राज्यातही केंद्र शासनाने लागू केलेल्या नवीन कृषी विधेयका विरोधात आज ८ डिसेंबर २०२० रोजी विरोधीपक्षांनी पुकारलेल्या 'भारत बंद' च्या पार्श्वभूमीवर शासन दफ्तरी अतिसंवेदशील तालुका म्हणून नोंद असलेल्या पुर्णा तालुक्यात तालुक्याचे नुतन पोलिस उपविभागीय अधिकारी सुभाष राठोड हे स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था हाताळ्यात पुर्णा पोलिस प्रशासन सक्षम असल्याचे निदर्शनास येत असून पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.गोवर्धन भुमे यांनी शहरासह तालुक्यातील पुर्णा-झिरोफाटा रस्त्यावरील झिरोफाटा टि पॉईंट,बरमाळा परिसर,एरंडेश्वर,झिरोफाटा, तसेच पुर्णा-चुडावा मार्गावरील ताडकळस फाटा,पुर्णा-ताडकळस मार्गावरील तहसिल परिसर बॉम्बे ब्रिज पुर्णा-बरबडी-सुहागण-हैतनगर मार्ग,पुर्णा-पांगरा ढोणे-वसमत मार्गावर आदी भागांसह शहरातील विविध भागात चोख बंदोबस्त लावण्यात आला असून उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड हे परिस्थितीवर काटेकोरपणे लक्ष ठेवून असल्याने कायदा व सुव्यवस्थेला कुठेही गालबोट लागणार नाही याची विशेष खबरदारी पोलिस प्रशासन घेत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या