💥औरंगाबाद येथुन दोन दिवसापुर्वी परभणीत आलेल्या युवकाचा संशयास्पद झालेल्या मृत्यूने खळबळ...!


💥शहरातील धार रस्त्यावरील आनंदनगरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह💥

परभणी (दि.५ डिसेंबर) - औरंगाबाद येथून दोन दिवसापुर्वी परभणी शहरात आलेल्या आलेल्या एका युवकाचा शहरातील धार रस्त्यावर असलेल्या आनंदनगरात आज दि.५ डिसेंबर २०२० रोजी सकाळच्या सुमारास संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.दरम्यान या घटने बाबत नानलपेठ पोलिस अधिक तपास करत असून वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

संशयास्पद मृत्यू झालेल्या युवकाचे नाव राजू पवार असून तो औरंगाबाद येथुन दोन दिवसांपुर्वी परभणीत आला होता, अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली काल शुक्रवार दि.४ डिसेंबर २०२० रोजी रात्रीच्या सुमारास तो आनंदनगरातील एका मंदिरात झोपला होता. मात्र आज शनिवार दि.५ डिसेंबर रोजी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात त्या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने नानलपेठ पोलिसांना याची माहिती दिली. नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, फौजदार संतोष मुपडे आदींनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आला. 

दरम्यान, मृतदेहाच्या पाहणीतून कुठेही मारहाण झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अहवालातून स्पष्ट होईल, अशी माहिती नानलपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिलासाशी बोलताना म्हटले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या