💥धनगर साम्राज्य सेनेच्या तक्रारीची तात्काळ दखल; फलकही लागले...!


💥निर्णयामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे💥

प्रतिनिधी

शुक्रवारी परभणी जिल्हा निबंधकाकडे धनगर साम्राज्य सेनेच्यावतीने तक्रार करताच तिची तत्काळ अंमलबजावणी झाली. सोमवारी जिनिंग च्या समोर फलकही लावण्यात आले.कापसाच्या गाडीचे मोजमाप झाल्यानंतर ती खाली करण्यासाठी हमालीच्या नावाखाली जिनिंग मालकाकडून प्रतिक्विंटल पंधरा रुपये प्रमाणे शेतकऱ्याकडून पैसे उकळण्यात येत होते. ही बाब अनुभवास येतात धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी शुक्रवारी जिल्हा निबंधक सुरवसे साहेब यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीची त्यांनी तात्काळ दखल घेत ही बेकायदा वसुली बंद करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर जिनिंगच्या समोर पैसे घेतले जात नाहीत असे फलकही लावण्याचे आदेश दिले .त्याची अंमलबजावणी सोमवारी झाली. शहरातील महेश जीनिग समोर फलक लावण्यात आला. निर्णयामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या