💥पुर्णेतील मानुसकीची साथ समूह ग्रुपच्या मानुसकीला सर्वसामान्य जनता करत आहे 'सलाम'...!

 


💥लॉकडाऊन काळात असंख्य गोरगरीब कुटुंबांना धान्य वाटपाच्या उपक्रमानंतर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप💥

पूर्णा (दि.४ डिसेंबर) - शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु केलेल्या लॉकडाऊच्या सहा महिण्याच्या कालावधीत शहरातील विविध भागातील गोरगरीब रोजमजूर गरजवंत कुटुंबांची उपासमार होऊ नये याकरिता मानुसकीची भावना जोपासत 'मानुसकीची साथ समूह ग्रुपने' असंख्य कुटुंबांना धान्यासह जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करीत माणूसकीची भावना जोपासली होती याच मानुसकीची साथ समूह ग्रुपच्या वतीने पुन्हा एकदा मानुसकीचे नाते जोपासत गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षनिक साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा,समता विद्यालय,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डॉ. आंबेडकर नगर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजी नगर या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना १ लॉगबुक वह्या,पेनी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या शैक्षणिक साहित्य वाटपा वेळी मानुसकीची साथ समुह ग्रुपचे प्रा.नशीर शेख अमन जोंधळे,भूषण भुजबळ भिमा वाहुळे यांच्यासह या ग्रुपचे अनेक सदस्य उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या