💥परभणी जिल्हा पोलिस दलातील २१ पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती....!


💥जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना काढले आदेश💥

परभणी (दि.३ नोव्हेंबर) - परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मिना यांनी पोलीस दलातील ५ पोलीस हवालदार यांना सहाय्यक फौजदारपदी, ६ पोलीस नाईक यांना पोलीस हवलदारपदी तर १० पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस नाईकपदी काल बुधवार दि.२ डिसेंबर २०२० रोजी पदोन्नती देण्यात आल्याचे आदेश काढले.


पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस हवालदार देविदास बेंद्रे,सय्यद चांद सय्यद इब्राहिम, बोरी पोलीस स्थानकातील बाबुराव शिंदे, मुख्यालयातील शेख रशीद शेख इब्राहिम व सय्यद अन्वर अली सय्यद अकबर यांना सहाय्यक फौजदार (ए.एस.आय) पदावर पदोन्नती दिली. तसेच सहाय्यक पोलीस नाईक यांना पोलीस हवलदारपदी तर दहा पोलीस शिपाई यांना पोलीस नाईकपदी पदोन्नती देण्यात आल्याचे काल बुधवारी उशीरा पोलीस अधिक्षक मीना यांनी पदोन्नतीचे आदेश काढले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या