💥पुर्णा तालुक्यातील ९४ गावामध्ये शेतशिवारातील पांदन रस्त्यांसह शिवरस्त्यांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील...!


💥त्यासाठी तालुक्याच्या तहसिलदार पल्लवी टेमकर यांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे केले आवाहन💥

रामा पारवे - ग्रामीण प्रतिनिधी

पूर्णा (दि.३० डिसेंबर) तालुक्यात पांदन रस्त्यांसह शिवरस्त्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्या मुळे शेत शिवारातील शेतकऱ्यांसह भाव भावकीत वेळोवेळी वाद निर्माण होत असल्याने तालुक्यातील ९४ गावामध्ये शेतशिवारातील पांदन रस्त्यांसह शिवरस्त्यांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील असून पांदन रस्त्यांसह शिवरस्त्यांचा प्रश्न सुटल्यास वादविवादासह कमी होतील व शेतमालासाठी दळणवळण करणे सोपे होइल त्यासाठी तालुक्याच्या  तहसिलदार पल्लवी टेमकर यांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहन केले.

 पुर्णा तालुक्यातील खांबेगाव - महातपुरी शिवरस्त्याचे शिल्पकार पोलिस पाटील माधव दुधाटे आणि रंगनाथ गोरे दाजी यांनी लोकसहभागातून पुर्ण केला रस्ता. 

     खांबेगाव आणि महातपुरी या दोन गावांच्या सिमेवर १.५ किमी लांबीची जुन्या काळातील वाट होती, मध्यंतरी च्या काळात दोन्ही बाजूंनी शेतकरी बांधवानी शिव रस्ता पाऊलवाटेत रूपांतरित केला. फक्त कालव्याचे  चे पाणी जाण्या साठी चारी  शिल्लक राहिली आणि सुरू झाला जिवघेणा संघर्ष. खालच्या बाजूला असलेल्या लोकांना वाटच राहीली नाही, माय माऊली आणि जनावरे यांचे अतोनात हाल, पायाने जाण्यासाठी अंगावर काटा यायचा ऐवढी बिकट वाट पण शेतात जावेच लागणार, अजु बाजुचे शेतकरी शेतातुन जाऊ नये म्हणून काट़या कुपाट्या लावायचे , आमच्या शेतातुन जाऊ नका म्हणू सांगत. चार महिने पावसामुळे आणि नंतर जायकवाडी च्या पाण्यामुळे सतत चिखल असायचा. 


मागील दोन वर्षांपासून रस्ता करु हा विचार फक्त विचारच राहु लागला. या मधे खांबेगाव, महातपुरी, ताडकळस, तामकळस, नांदेड येथील लोक, प्रत्येकाला रस्ता मोकळा पाहीजे पण आपल्या शेतातुन गेला नाही पाहिजे अशी अपेक्षा करणारे जास्त. 

   या अशा परिस्थितीत खांबेगावचे तरुण आणि सुशिक्षित, समंजस पोलिस पाटील माधव दुधाटे यांनी या कामासाठी पुढाकार घेऊन हा रस्ता पुर्ण केला. लोक सहभागातून हे सर्व काम पुर्ण झाले. या मधे पाटलांना भक्कम साथ आमच्या रंगनाथ गोरे दाजी यांनी दिली.  आपण सर्व जण दिपावली चा सण आपल्या घरी उत्साह पुर्वक करुत गोड धोड खात घरी होतोत त्या वेळी हे दोघे जण चोवीस तास रस्ता करण्यात मशीन सोबत होते. लोका कडुन पैसे जमा करणे, मार्क आऊट टाकणे, जेसीबी कर्मचारी यांची भोजन व्यवस्था करणे इत्यादी मधे गुंतले होते. यांच्या व यांना अनेक मित्रानी केलेल्या मदतीने हे काम पूर्ण झाले.

   पोलिस पाटील माधव दुधाटे आणि गोरे दाजी व या रस्त्यावर ज्या ज्या शेतकऱ्यांनी मदत केली असे  चारही गावातील शेतकरी, या कामात वेळोवेळी  आलेल्या अडचणीत ताडकळस येथील नेत्यांनी मदत केली, तसेच आमचे तलाठी श्री  बनसोडे  यांनी सुध्दा खूप मदत केली व या व्यतिरिक्त ज्यांचे मदतीचे हात या कामासाठी लागले त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व खुप खुप आभार. 

    गावामध्ये या सारख्या अनेक समस्या आहेत, आपण सर्वांनी एक एक समस्या हाती घेऊन त्यात मन लावून काम केले तर जगणे सुंदर होईल असे गावातील ज्येष्ठ नागरीक बोलुन दाखवत आहेत .

--------------------------------------------------------------------------

💥सुरेश शृंगारपुतळे मा.सरपंच खांबेगाव 

       गावातील तरुणाइच्या ध्यासाने शेतरस्त्याचा श्वास मोकळा झाला म्हणून गावातील छोट्या छोट्या समस्येवर काम केले तर ग्रामीण भागात वादविवादा न होता आदर्श कल्पना जन्माला येतील पुढाकार घेणाऱ्या दोघांचे व सहकार्य करनाऱ्या सर्वाचे कौतुक .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या