💥परभणी जिल्ह्यातील सेलूत शेतकरी विरोधी कायद्याची आंदोलन कर्त्यांनी केली प्रतिकात्मक होळी...!


💥भारत बंदला सेलू शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे💥

परभणी (दि.८ डिसेंबर) - केंद्र सरकारच्या नवीन शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ आज मंगळवार दि.८ डिसेंबर २०२० रोजी भारत बंदला सेलू शहरात चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी शेतकरी विरोधी तिन्ही कायद्यांची आंदोलकांकडून प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

केद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लागू केलेले हे तिनही कायदे मागे घेण्याविषयीचे निवेदन तहसीलदार बालाजी शेवाळे यांना देण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडलकर, जिल्हा परिषद माजी सभापती अशोक काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यचिटणीस डॉ. संजय रोडगे, मिलिंद सावंत, पवनराजे आडळकर, मारोती चव्हाण, संदीप लहाने, कॉ. रामकृष्ण शेरे, कॉ. रामेश्वर पौळ, कॉ. उध्दव पोळ, रमेश डख, संभाजी पवार, विनोद तरटे, मनीष कदम, सचिन राऊत, रघुनाथ बागल, समाजवादी पक्षाचे दिलावर भाई, माऊली ताठे, पंचायत समितीचे सभापती पप्पू गाडेकर,ऍड विष्णू ढोले,विठ्ठल डख,गौस लाला,परवेझ सौदागर, दिलावरभाई, अबरार कुरेशी आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या