💥परभणीत ऑस्ट्रेलिया देशात सुरू असलेल्या बिग बॅश लीग मधील ॲडीलेट हॉर्बट विरूध्द सिडनी स्टायलर टिमवर सट्टा....!


💥विशेष पथकाने धाड टाकून चार सट्टेबाजांसह ३ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल घेतला ताब्यात💥

परभणी (दि.१५ डिसेंबर) शहरात मागील काही दिवसा पासून क्रिकेट वर सट्टा चालवणारी सट्टेबाजांची टोळी कार्यरत असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र चालत होती त्यामुळे पोलिस प्रशासन कमालीचे सतर्क झाले होते त्या दृष्टीने जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी अवैध धंद्यांच्या समुळ उच्चाटनासाठी स्थापन केलेले विशेष पथक पाळत ठेवून होते.विशेष पथकातील परिविक्षाधीन पोलिस उपाधिक्षक बापूराव दडस, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार,सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विश्वास खोले यांच्यासह पथकातील सहकारी पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ,यशवंत वाघमारे,राहुल चिंचणी,शंकर गायकवाड, जमीर फारूकी, आजहर पटेल, विष्णू भिसे,दिपक मुदीराज यांनी  गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आज मंगळवार दि.१५ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ३-३० वाजेच्या सुमारास शहरातील परभणी-गंगाखेडकडे जाणाऱ्या रोडच्या बाजुस कालिका मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही इसम सोनी- १० या चॉयनलवर ऑस्ट्रेलिया देशात सुरू असलेल्या बिग बॅश लीग मधील ॲडीलेट हॉर्बट विरूध्द सिडनी स्टायलर टिममधील लायु क्रिकेट सामन्यावर लोकांकडून पैसे घेऊन क्रिकेट सट्टा नावाचा जुगार खेळ खेळणाऱ्या बुक्कीवर पथकाने जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांच्या आदेशानुसार व अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली धाडसी कारवाई करीत ४ सट्टेबाजांना पथकाने १० मोबाईल, ३ मोटरसायकलसह एकून ३ लाख ८ हजार ८०० रुपयांच्या मुद्देमालासह रंगेहाथ पकडले या धाडसी कारवाई वेळी पथकाने कमालीची गुप्तता पाळली होती.

परभणी शहरात विशेष पथकाने क्रिकेट सट्टेबाजांच्या विरोधात केलेली ही सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या गणेश माधवराव पांचाळ रा.यशवंत नगर परभणी,गोविंद दामोधर आबूज रा.कल्याण नगर परभणी,सचिन श्रीरंगराव बनसोडे रा.शिवराम नगर परभणी,किशोर श्रीकिशन तोष्णीवाल रा.शिवराम नगर परभणी यांच्या विरोधात कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या