💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्सच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या हेडलाईन....!


💥'रस्ता मला मानसिक, शारीरिक त्रास देतोय' औरंगाबादमध्ये महिलेची चक्क रस्त्याविरोधात पोलिसांत तक्रार💥 

✍️ मोहन चौकेकर

1.  उद्या शेतकऱ्यांचा देशव्यापी बंद, देशभरातील अनेक पक्षांचा आंदोलनाला पाठिंबा ; राज्यातील बाजार समित्याही शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी होणार, उद्या अनेक मार्केट बंद 

2. चार्टर्ड अकाऊंटंट फांऊडेशनच्या उद्या होणाऱ्या पेपर-1 ची परीक्षा पुढे ढकलली; 13 डिसेंबर (रविवार) ला परीक्षा घेण्याचा सीए इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा निर्णय 

3. उद्या संवेदनशील मार्गावर एसटीची वाहतूक बंद राहणार; भारत बंदच्या पार्श्वभूमीवर निर्णय  

4. शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचा पाठिंबा, शिवसेना अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभी असल्याचा खा. संजय राऊत यांचा दावा 

5. बिबट्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी मजुराच्या आठ वर्षीय मुलीचा मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात तिसरा मृत्यू, नरभक्षक बिबट्याच्या शिकारीचे आदेश जारी

, राज्यात वर्षभरात बिबट्यांच्या हल्ल्यात 30 जणांनी गमावला जीव, 10 वर्षातील सर्वोच्च संख्या 

6. राजकीय अस्तित्व वाचविण्यासाठी विरोधकांचा आंदोलनात सहभाग; केंद्रीय विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांचा हल्लाबोल 

7. मुंबई पोलीस अन् ईडी समोरासमोर येण्याची शक्यता! रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल 

8. कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्या; सीरम इन्स्टिट्यूटची केंद्र सरकारकडे मागणी 

9. पुण्यात रशियाच्या 'स्पुतनिक 5' लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात; 17 स्वयंसेवकांना दिला डोस 

10. 'रस्ता मला मानसिक, शारीरिक त्रास देतोय', औरंगाबादमध्ये महिलेची चक्क रस्त्याविरोधात पोलिसांत तक्रार 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या