💥सह्याद्री .....सह्याद्री म्हणजे स्वराज्य....सह्याद्री म्हणजे अवघा महाराष्ट्र....!


💥पुर्णा तालुक्यातील मौ.कंठेश्वर येथील इंजि. प्रा.हनुमान कदम यांनी सह्याद्रीतील तब्बल २० ते २५ किल्ले ट्रेकिंग करून चढाई केली💥 सह्याद्री .....सह्याद्री म्हणजे स्वराज्य..सह्याद्री म्हणजे अवघा महाराष्ट्र ."गड फिरायचं नसतो तर तो जगायचा असतो."असे नेहमी सांगणारे परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील मौ.कठेश्वर येथील रहिवासी असलेले धाडली शिवप्रेमी प्रा. इंजि. हनुमान उर्फ राजु कोंडीराम कदम यांनी आतापर्यंत सह्याद्रीतील तब्बल २० ते २५ किल्ले ट्रेकिंग करून चढाई केली आहे.त्यांचा हा अनुभव अत्यंत महत्त्वपूर्ण असून कौतुकास्पद आहे. कारण सध्याच्या पिढीला महाराजांच्या स्वराज्यातील गड किल्ले विषयी ओढ लावण्याचे काम ते सातत्याने करत असतात आणि दरवर्षी किमान तीन ते चार किल्ले ट्रेकिंग करत असतात .किल्ले पाहणे हि त्यांची आवड आहेच  पण त्या ठिकाणांची स्वच्छता देखील ते करतात. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या किल्ल्यावर जाता त्यावेळेस त्या ठिकाणी काही केरकचरा असेल तर तो जमा करून एका ठिकाणी टाकून द्यायचा. खरंच आजच्या पिढीला खूप गरज आहे महाराजांच्या इतिहासाची आणि त्यांच्या गडकिल्ल्यांची .ते फक्त गड किल्ले फिरत नाहीत तर त्यांचं महाराजांविषयी आणि संभाजी महाराजां विषयी भरपूर वाचन देखील झाले आहे .आजच्या तरुण पिढीला त्यांचा एक संदेश आहे की प्रत्येकाने किमान दहा तरी किल्ले पहावेत, म्हणजे येणाऱ्या पिढीला काहीतरी इतिहास सांगण्यास शिल्लक राहील .त्यांचे नेहमीच वाक्य म्हणजेच 'थोडस सह्याद्री च्या प्रेमात❣🚩'


त्यांनी महाराजांविषयी आणि सह्याद्रीतील गड किल्ल्या विषयी माहिती देणार स्वतःच एक facebook page तयार केले आहे .तुम्ही त्या page ला भेट देऊन संपूर्ण पोस्ट वाचून likeआणि share देखील करू शकता. Page चे नाव आहे .

" प्रा इंजि हनुमान कदम- स्वराज्यप्रेमी"

🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या