💥पुर्णा पोलिस प्रशासनाची अवैध चोरट्या रेतीची तस्करी करणाऱ्या वाहना विरोधात धाडसी कारवाई...!

 


💥धाडसी सपोनि.प्रविण धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या कारवाईत ४ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त💥


पुर्णा (दि.२९ डिसेंबर) - तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रातून अवैध चोरट्या रेतीनचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी जाणाऱ्या वाहनां विरोधात पुर्णा पोलिस स्थानकाचे कर्तव्यनिष्ठ सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रविण धुमाळ व सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी धडक मोहिम राबवण्यास सुरूवात केली असून आज मंगळवार दि.२९ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास सपोनि.प्रविण धुमाळ व सहकारी पोलिस कर्मचारी पो.कॉ.अक्षय वाघ,पो.कॉ.गिरिष चन्नावार,पो.कॉ.कलीम यांनी झिरोफाटा रोडकडून पुर्णा शहरात येणाऱ्या रोडवर नव्या मोंढ्याच्या पाठीमागील गेटसमोर अवैध चोरट्या रेतीने भरलेला टिप्पर क्र.एम.एच.४३ ई ७५७३ हा ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई केली असून या कारवाईत टिप्परसह दोन ब्रास रेती असा एकून ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून सपोनि.धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पुर्णा पोलिस स्थानकात आरोपी टिप्पर चालक मोहम्मद नुर मोहम्मद निजाम रा.फुले नगर पुर्णा व मालक सुमेर पठाण रा.एकबाल नगर पुर्णा यांच्या विरोधात गुरनं.३७८/२०२० कलम ३७९,३४ भादवीसह कलम ४८(७)(८) गौण खनिज कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.रणखांब हे करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या