💥समाजासाठी जगले तरच जिवण सार्थकी बनते समाधानकारक झोप लागते म्हणून सत्कर्म करीत जाणे गरजेचे - सुभाषराव राठोड


💥रात्रीच्या गस्ती बाबत नागरिकांना मार्गदर्शन कार्यक्रमात उप विभागीय पोलिस आधिकारी राठोड बोलत होते💥

पूर्णा (दि.१४ डिसेंबर ) समाजासाठी जगले तरच जिवण सार्थकी बनते समाधानकारक झोप लागते म्हणून सत्कर्म करीत जाणे गरजेचे असे प्रतिपादन पुर्णेचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस आधिकारी सुभाषराव राठोड यांनी केले. 

    अमृत नगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या प्रांगणात रात्रीच्या गस्ती बाबत नागरिकांना मार्गदर्शन कार्यक्रमात उप विभागीय पोलिस आधिकारी बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष एल एन मित्रे , पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे , जिजा कहाते ,ॲड . यादवराव डाखोरे,व्यंकटराव मुळे,टी.एन.पांचाळ आदीची प्रमुख उपस्थिती होती. संभाजीनगर,न्यू आदर्श नगर,अमृत नगर परिसरात सतर्क जागरूक नागरिकांनी  दररोज रात्रगस्तीचे (रवण ) आयोजन केले आहे.  त्यांना मंगळवार दि.०८ डिसेंबर २०२० रोजी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस निरिक्षक गोवर्धन भुमे यांनी ग्राम सुरक्षा करणे व पोलिसांना नागरीकांना सहकार्य केले तरच पोलीस बांधव चांगले काम करु शकतात म्हणून सर्वांचे कौतुक केले.कार्यक्रमास सर्व गस्त बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत शिंदे यांनी केले सूत्रसंचालन अच्युत जोगदंड आभार भगवानराव ढोणे यांनी मानले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या