💥पुर्णा तालुक्यातील तरुण मित्रांनों सावधान; रात्र वैऱ्यांची आहें आपआपसातील किरकोळ वाद टाळा...!


💥कोरोना महामारीवर मात ? मग किरकोळ वादाला दंगलीचे रुप देणाऱ्या या 'निरपराधांना अपराधी करोना महामारीचे' काय ?💥  

✍️प्रतिघात - चौधरी दिनेश (रणजीत)

संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे भयंकर संकट ओढवल्याने सन २०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठीच नव्हें तर भारतासह महाराष्ट्रासाठी सुध्दा अत्यंत खडतर वर्ष म्हणून ठरले कोविड-१९ मुळे असंख्य घर अक्षरशः उजडली राज्या प्रमाणेच आपल्या परभणी जिल्ह्यातही या 'कोरोना महामारीचा' फटका अनेकांना बसला पहाता पहाता अनेक लोक या महामारीला बळी पडले परंतु या कोरोना महामारीच्या काळातही जिल्ह्यातील अत्यंत संवेदनशिल तालुका म्हणून सातत्याने शासकीय दफ्तरी आपल्या अतिसंवेदनशिलतेची 'रिकॉर्ड ब्रेक' नोंद प्रत्येक वर्षी कुठल्यातरी कारणाने करणाऱ्या या 'पुर्णा तालुक्यात ही संवेदनाशील मनाची व मानुसकी जोपासनारी मानस राहतात याचा प्रत्येय प्रशासनासह सर्वसामान्य जनतेलाही एकदाचा आला तब्बल सहा महिण्यांच्या लॉकडाऊन' काळात असंख्य रोजमजूर-शेतमजूर,बांधकाम कामगार,घरगुती कामगार,किरकोळ भाजीपाला विक्रेते,किरकोळ हॉटेल व्यवसायीकांवर अक्षरशः उपसमारीची वेळ आली असतांना व प्रशासनही यांच्या मदतीला धावण्यात कमकुवत ठरत असतांना शहरातील सर्वसामान्य दात्यांच्या पुढाकारातून हिंदु-मुस्लीम-बौध्द-क्रिश्चन तरुणांनी मानुसकीची भावना जोपासत त्यांना आपआपल्या परीने जिवणावश्यक वस्तुंसह खाद्य साहित्याचा पुरवठा करुन संपूर्ण जिल्ह्यासह मराठवाड्यातील जनतेलाही खरी राष्ट्रीय एकात्मता काय असते याचे जिवंत उदाहरण आपल्या कर्तृत्वातून घडवून दिले.


सन २०२० या वर्षात संपूर्ण राज्यासह परभणी जिल्ह्यातही कोरोना महामारीने हाहाकार माजवला असतांना मात्र जिल्ह्यातील पुर्णा तालुका राजकीय षडयंत्रकारांच्या निरपराध तरुणांना गुन्हेगार 'करोना महामारी' या भयंकर कृत्रिम महामारीची झळ सातत्याने झेलतच होता आणि यापुढे सुध्दा सन २०२१ या नवीन वर्षात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात पुर्णा नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झेलतच राहणार त्यामुळे तालुक्यातील सर्व समाजातील सर्व धर्मातील माझ्या तरुण मित्रांनों सावधान...'रात्र राजकीय षडयंत्रकारी कपटी वैऱ्यांची आहे' आपआपसातील किरकोळ वाद टाळा अन् कोरोना महामारीवर यशस्वी मात केल्या प्रमाणेच... 'निरपरांधांना अपराधी 'करोना महामारीला' बळी होणे निश्चितच टाळा' तुमच्याच जिवावर तुमच्याच मतांवर स्वतःच्या सात पिढ्यांचे भविष्य उज्वल करणारे नालायक लोक तुमच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मोर्तब करुन तुमच्या येणाऱ्या सात पिढ्यांचे भविष्य उध्वस्त करण्याचा भयंकर प्रकार मागील सन २००६ या वर्षापासून सातत्याने करीत असल्याचे निदर्शनास येत असतांना मात्र तुम्ही 'बिअरबार धाबेशाही मेजवानीला' बळी पडून सातत्याने गुन्हेगारीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत स्वतःच्या जन्मदात्यांच्या अपेक्षांची उपेक्षा करीत आहात विरोधात जाणाऱ्या किंवा विरोधी गटात जाऊन विरोधात बोलणाऱ्या निरपराध कार्यकर्त्यांसह निरपराध तरुणांना अट्टल गुन्हेगार बनवण्याच्या 'निरपरांधांना अपराधी करोना महामारी' या मालिकेला खरी सुरूवात सन २००६ या वर्षापासून झाल्याचे निदर्शनास येत असून बिअरबार-धाबेशाहीच्या मेजवानीला बळी पडलेल्या काही तरुणांमध्ये शहरा बाहेरील गॅस एजन्सी परिसरात झालेल्या वादाला खतपाणी घालून दंगलीचे स्वरुप देत एकाच घटनेत तब्बल तिन चार बोगस गंभीर गुन्हे दाखल करून नंतर त्या तरुणांवर 'एमपीडी ॲक्ट' अंतर्गत झालेली कारवाई म्हणजेच 'निरपराधांना अपराधी करोना महामारीला' झालेली खरी सुरूवात म्हणावी लागेल सदरील पडद्या मागील 'व्हाईट कॉलर' राजकीय दहशतवाद्यांनी तयार केलेल्या या  'निरपरांधांना अपराधी 'करोना महामारी' स्वरूपातील व्हायरसचा प्रादुर्भाव सन २००६ ते सन २०२० या तब्बल चौदा वर्षाच्या कालावधीत सातत्याने जिल्ह्यासह तालुक्यातही मोठ्या प्रमाणात फैलत असतांना या 'करोना महामारीस' रोखण्याची क्षमता असलेली एकही प्रतिबंधात्मक लस अद्यापही या जिल्ह्यात निर्माण झाल्याचे निदर्शनास येत नसून या 'निरपराधांना अपराधी करोना' महामारीचा भयंकर प्रत्येय येण्यास सन २०१४ पासून झाली पानपट्टीवर चुण्याची डब्बी घेण्याच्या किरकोळ वादावरून झालेली दंगल,यानंतर शहरात सन २०१६ यावर्षी दोन दंगली झाल्या यात १९ जानेवारी २०१६ रोजी शहरातील आनंद नगर परिसरात मोटरसायकलचा धक्का लागले वरून झालेली दंगल,यानंतर २७ एप्रिल २०१६ रोजी तालुक्यातील मौ.कात्नेश्वर येथे महापुरूष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणूकीवर दगडफेक करीत जातीय दंगल पसरवण्याचा प्रयत्न तर १४ एप्रिल २०१७ रोजी शहरातील महादेव मंदिर परिसरात महापुरूष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणूकीवर झालेल्या दगडफेकीनंतर उसळलेली दंगल,शहरात दोन वर्षापूर्वी  दि.२५ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ०२-३० वाजेच्या सुमारास एका वादग्रस्त राजकीय पुढाऱ्याच्या इन्होवा कारचा एका सायकल वरून शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलीला धक्का लागल्याच्या कारणामुळे प्रथमच एका राजकीय पुढाऱ्यामुळे उघडपणे घडवण्यात आलेली दंगल अश्या प्रत्येक राजकीय षडयंत्रातून घडवण्यात आलेल्या दंगलीं नंतर दंगलीच्या खऱ्या सुत्रधारांना पाठीशी घालून त्यांच्याच इशाऱ्यावर 'निरपराध तरुणांना' दंगलखोर ठरवून तयार झालेल्या नावांच्या याद्यां प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करण्याचा गंभीर प्रकार म्हणजे 'निरपराधांना अपराधी करोना महामारीच' म्हणावी लागेल ना ? पडद्या मागील 'व्हाईट कॉलर' दंगलीच्या अस्सल सुत्रधारांना पाठीशी घालून सर्वसामान्य निरपराध तरुणांना अपराधी बनवण्याचा हा कुटील डाव शेवटी थांबणार तरी केव्हा ? या गंभीर प्रश्नाचे उत्तर शोधण्याची बुध्दीमत्ता असलेला एकतरी बुध्दीमान प्रशासकीय अधिकारी- शभर अपराधी सुटले तरी चालतील परंतु एक निरपराध डोळ्यावर पट्टी बांधून अंधत्व पत्करलेल्या न्यायदेवतेच्या दरबारी बळी पडू नये याकरीता निस्वार्थपणे लढा देणारा काळ्या कोटातील कायदेतज्ञ-सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर राहणारा पांढऱ्या शुभ्र खादीतील निर्मळ मनाचा राजकीय पुढारी-जनहीताशी बांधिलकी जोपासत स्वतःच्या रक्ताची शायी बनवून जनसामान्यांवरील अन्याया विरोधात परखडपणे आपली लेखणी झिजवणारा निर्भीड पत्रकार-किंवा भरकटलेल्या न्यायव्यवस्थे विरोधात बगावत करणारा एखादा बागी समाजसेवक समोर येईल काय ? चिन देशातून मानव निर्मित 'कोरोना व्हायरस' या जागतिक महामारीला तर आम्ही यशस्वीपणे लढा दिला परंतु मागील चौदा वर्षापासून संपूर्ण तालुक्यात सातत्याने  हाहाकार माजविणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पडद्या मागील राजकीय षडयंत्रकाऱ्यांणी,समाजकंठक गुंड माफिया अवैध धंद्यांचे साम्राज्य स्थापित करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींनी  निर्माण केलेल्या 'निरपराधांना अपराधी करोना महामारीचे' काय' ? या महामारीचे तरुणांनो शेवटी तुम्ही कुठवर बळी जाणार आहात ? गटारात तोंड घालून विष्ठेवर यथेच्छ तोंड मारणाऱ्या वराहा प्रमाणे जनसामान्य तरुणांच्या आपआपसातील किरकोळ वादात तोंड खुपसून त्या घटनेतील तरुणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करून त्यांना अट्टल गुन्हेगार बनवण्याची निच विषारी प्रवृत्ती तालुक्यात मागील अनेक वर्षापासून फनी काढून बसल्याने असंख्य तरुणांचे उभे आयुष्य उध्वस्त होऊन अनेक कुटुंब अक्षरशः बर्बाद झाली असल्यामुळे माझ्या तरुण मित्रांनो आता तरी सावधान व्हा...आज ३१ डिसेंबर २०२० हा कोरोना व्हायरस या जागतिक महामारीत जखडलेल्या वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने 'थर्टीफस्ट'च्या नावावर या शेवटच्या दिवशी 'बिअरबार-धाबेशाहीच्या' विळख्यात अडकून आपआपसातील किरकोळ वादाला जरी निमंत्रण द्याल तरी येणाऱ्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२१ च्या पार्श्वभूमीवर तुमच्यावर दंगलखोराचा शिक्का मोर्तब करण्यासाठी पडद्यामागील राजकीय षडयंत्रकारी डोमकावळे टपलेलेच आहेत याचे सुध्दा भान असू द्या..तालुक्यातील माझ्या तमाम सर्वधर्मीय सर्व समाजातील मित्रांनों सावधान राहा...आज रात्र वैऱ्यांची आहे आपआपसातील किरकोळ वाद मात्र टाळा... अरे..वाटल्यास एखाद कुत्र पाळा परंतु पडद्या मागील षडयंत्रकारी राजकीय निच वराहांची संगत मात्र निश्चितच टाळा अन् कायद्याचे बंधन पाळा....

 

  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या