💥पुर्णेतील महावितरण कंपनीचे शहराबाहेर स्थलांतरीत केलेले कार्यालय पुन्हा शहरात स्थलांतरीत करण्याची मागणी...!


💥शिवसेना शहर प्रमुख मुंजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपअभियंत्यांना दिले लेखी निवेदन💥

पुर्णा (दि.१० डिसेंबर) - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील महावितरण शहर शाखा कार्यालय शहराबाहेरील पुर्णा-ताडकळस मार्गावरील ३३ केव्ही उपकेद्रात हलवले त्यामुळे शहरी भागातील विज ग्राहकांना विज वितरणा संदर्भातील बिल दुरूस्ती,नवीन विद्युत कनेक्शन,मिटर संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून सदरील कार्यालय शहराबाहेर बऱ्याच अंतरावर असल्यामुळे विज ग्राहकांची अक्षरशः पायपीट होत असल्याने विज ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सदरील कार्यालय पुन्हा शहरात हलवण्यात यावे यासाठी शिवसेना शहर शाखा पूर्णाच्या वतीने शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री.नाईक यांची भेट घेऊन एका लेखी स्वरूपात दिलेल्या निवेदनाद्वारे शहरातील विजवितरण विभागाचे शहर शाखा कार्यालय पुन्हा तात्काळ शहरात स्थलांतरीत करण्याची मागणी केली असून सदरील कार्यालय शहरात पुन्हा स्थलांतरीत केले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला असून या निवेदनावर शहर प्रमुख मुंजाभाऊ कदम,युवासेना तालुका प्रमुख बंडू आप्पा बनसोडे,युवासेना शहर प्रमुख विकास वैजवाडे,युवासेना शहर चिटणीस विद्यानंद तेजबंद,उपशहरप्रमुख प्रमुख कालिदास वैद्य, युवानेते सुनिल कदम,सचिन रणगडे,उमेश कल्याणकर,भागवत  कऱ्हाळे आदींच्या स्वाक्षरी आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या