💥पुर्णा तालुक्यातील वाई लासिनात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सन २०२०/२१ मधील पिक विमा मंजूर करावा...!


💥वाई लासिना यथील विमाधारक शेतकर्‍यांची मागणी💥

 पूर्णा (दि.२१ डिसेंबर) - तालुक्यातील वाई लासिना येथे शेतकऱ्यांचे सन २०२०/२१ मधील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मूग,उडीद,तूर,कापूस,सोयाबीन,ज्वारी या पिके हातची गेली  असल्याने परिणामी कष्टकरी शेतकऱ्यांची उपजीविकेचे साधन नष्ट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पिकावर कर्ज काढून उसनवारी करून मोठ्या प्रमाणात खर्च करून शेतकऱ्यांपुढे खर्चाची भरपाई होत नसल्या कारणामुळे वाईला शिना येथील शेतकऱ्यांनी पूर्णा तहसीलदार यांना तहसील येथील संबंधित उपस्थित अधिकारी यांच्यामार्फत तात्काळ विमा लागू करावा अशी मागणी करतेवेळी गोविंद डाखोरे ,शेषराव डाखोरे ,नामदेव लोखंडे, गंगाधर डाखोरे ,नारायण कदम ,परसराम डाखोरे ,घनश्याम डाखोरे ,व्यंकटी डाखोरे ,प्रभाकर डाखोरे आदी शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या करून निवेदन केले पूर्णा तशिल येथे सादर विमा मंजूर न झाल्यास कार्यालयासमोर  सर्व कुटुंबियासह उपोषणास बसू  असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला या निवेदनावर वाइ येथील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात स्वाक्ष-या असल्याचे माध्यमास बोलते वेळी गोविंद डाखोरे म्हणाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या