💥नंदागौळ येथे भव्य फळबाग लागवड प्रशिक्षण संपन्न....!


💥जलनायक मा.खा.मयांकजी गांधी यांच्या ग्लोबल परळी मार्फत भव्य फळबाग लागवड कार्यक्रम घेण्यात आला💥

परळी वैजनाथ (दि.६ डिसेंबर) :- परळी तालुक्यातील नंदागौळ येथील प्रगतशील युवा शेतकरी श्री संदीप रमेश गित्ते यांच्या फळबागेत आज दिनांक 6 डिसेंबर रोजी जलनायक मा.खा.मयांकजी गांधी यांच्या ग्लोबल परळी मार्फत भव्य फळबाग लागवड कार्यक्रम घेण्यात आला.

         या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री.डॉ.पाटील साहेब फळबाग संशोधन केंद्र औरंगाबाद यांनी लिंबू वर्गीय पिके याचे सखोल असे मार्गदर्शन केले.संदीप गित्ते यांनी पपई ची यशोगाथा व सेंद्रिय शेती बाबत माहिती दिली व बावस्कर टेकोनोलॉजी चे श्री सतीश बुरांगे साहेब यांनी इतर फळ बागेचे व्यवस्थापन याबाबत खूप अनमोल असे मार्गदर्शन केले.

या फळ बाग लागवड प्रशिक्षणला गुजरात,उत्तर प्रदेश,. कर्नाटक,. मध्यप्रदेश सह महाराष्ट्र् राज्यातील 300 प्रयोगशील शेतकरी यांनी प्रशिक्षण घेतले व संदीप गित्ते यांचे शेतीचे व्यवस्थापन व त्यांचे उत्पन्न पाहून समाधान व्यक्त केले.

ग्लोबल परळी मार्फत दिनांक 5 व 6 डिसेंबर रोजी हे प्रशिक्षण आयोजित केले होते या प्रशिक्षणामुळे पाच राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी डॉ. पाटील साहेब,सगरोळी चे देशमुख साहेब,ग्लोबल परळी च्या भैरवी मॅडम,अतुल कदम सर,शेप सर व त्यांची सर्व टीम तसेच अंबाजोगाई तालुका कृषी अधिकारी श्री ठाकूर साहेब,कृषी सेवक कांगणे साहेब,बुरांगे साहेब

जेष्ठ शेतकरी वसंत दादा गित्ते,बाजीराव गित्ते,कोंडीबा गित्ते,बालाजी गित्ते,पांडुरंग आबा गित्ते,अर्जुन नेताजी,व्यंकटी मुंडे,सारडा सेठ,प्रभाकर गित्ते,ज्ञानोबा गित्ते,सुभाष गित्ते,राहुल गित्ते,अरुण गित्ते,नागराज गित्ते,यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम गित्ते, सोमनाथ गित्ते यांनी केले.    

              शेतकरी संदीप गित्ते यांनी चालू वर्षी शेतीतून पपई, लिंबोणी,केशर आंबा,झेंडू फुल,शेवंती फुल,वारणा/वालाची सेंग, हळद,सोयाबीन ब रब्बी पिके यांपासून 20 ते 25 लाख उत्पन्न निघेल असे सांगितले. यांच्या प्रेरणेने नंदागौळ व परिसरातील शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरगोस उत्पनं घेताना दिसत आहे या सर्वांना प्रत्येक्ष मार्गदर्शन बुरांगे साहेब, सोळंके साहेब बावस्कर टेकोनोलॉजी यांचे भेट देऊन कौतुक केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या