💥गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शहरांसह ग्रामीण भागात विविध गावांमध्ये नवीन बसफेऱ्या सुरू करा - आ.डॉ.रत्नाकर गुट्टे


💥गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.गुट्टे यांनी विभागीय नियंत्रक यांच्याकडे केली मागणी💥

परभणी (दि.३१ डिसेंबर) - जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघातील माझ्या कार्यक्षेत्रात व ग्रामीण भागात बसच्या फेऱ्या कमी होत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून कोरोना महामारीच्या काळात परिवहन विभागाकडून माझ्या कार्यक्षेत्रातील अनेक बस बंद करण्यात आल्या होत्या त्यातील काही बस आत्ता सुरू झाल्याने व अनेक सुरू करण्यात आल्या नसल्याने आजच्या परिस्थितीत ग्रामीण भागात बसच्या फेऱ्या खूप कमी आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होत आहेत. 

ग्रामीण भागतील सर्वच मार्गावरील बस फेऱ्या तात्काळ सुरू कराव्या तसेच नवीन बस फेऱ्या सुध्दा चालू कराव्यात त्यामध्ये प्रामुख्याने गंगाखेड-पालम-चुडावा-लिबगाव-नांदेड ही बस दिवसातून सकाळ-दुपार-संध्याकाळ अश्या तीन वेळा सुरू करण्यात याव्या तसेच गंगाखेड-पालम-ताडकळस-पूर्णा-कात्नेश्वर-झिरोफाटा-औंढा-हिंगोली ही बस सकाळ-दुपार-संध्याकाळ अशी तीन वेळा,गाखेड-पालम-पूर्णा-झिरोफटा-वसमत ही बसफेरी तिन वेळा,गंगाखेड-पालम-पूर्णा-पेनूर-चुडावा-लोहा या बसची फेरी दिवसातून तिन वेळा,वसमत-झिरोफाटा-पूर्णा-ताडकळस-पालम-लोहा-लातूर या बसची सुध्दा फेरी दिवसातून तिन वेळा,वसमत-झिरोफाटा-पूर्णा-धनगर टाकळी-पारवा-लोहाहिंगोली-पूर्णा-लोहा-पेनूर-लातूर,हिंगोली-पूर्णा-धनगर टाकळी-पारवा-लोहा-कंधार,हिंगोली-झिरोफाटा-पूर्णा-दोन वेळा अशा प्रकारच्या नवीन बस फेऱ्या सुरू कराव्यात व प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत अशी मागणी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी विभागीय नियंत्रक परभणी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मागणी असून त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल-हेळसांड होणार नाही...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या