💥दिल्लीत कृषी कायद्या विरोधातील आंदोलनात शदिद झालेल्या शहीद शेतकऱ्यांना गंगाखेडात श्रद्धांजली...!


💥आंदोलनादरम्यान आता पर्यंत २२ शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवला आहे💥

गंगाखेड (दि.२० डिसेंबर) : दिल्लीच्या सीमांवर गेल्या अनेक दिवसांपासून किसान आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान आता पर्यंत २२ शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवला आहे. या शहीद शेतकऱ्यांना आज गंगाखेड शहरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. किसान आंदोलनाकडे केंद्र सरकार करत असलेलं दुर्लक्ष दुर्देवी आणि संतापजनक असून याची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

गंगाखेड शहरीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर मानव मुक्ती मिशन च्या वतीने या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. मानव मुक्ती मिशनचे प्रमुख नितीन सावंत, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव, भाकपाचे ओंकार पवार, संदिप जाधव, गजानन गिरी, सुरेश कोरडे, सुरेश ईखे, नागेश डमरे, शोएब पटेल, कृष्णा गायकवाड, रामेश्वर बचाटे, शामसुंदर जाधव, शेख सरवर, विकास रोडे आदिंसह बहुसंख्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची ऊपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या