💥पुर्णा येथील स्मृतीशेष एन.डब्ल्यू.गायकवाड यांच्या स्मृतिदिना निमित्त स्मशानभूमी मध्ये बोधिवृक्षा चे वृक्षारोपण...!


💥कार्तिक पौर्णिमेचे औचित्य साधून करण्यात आले बोधिवृक्षाचे वृक्षारोपत💥

पुर्णा (दि.१ डिसेंबर) - येथील आंबेडकरी व धम्म चळवळीतील समर्पित कार्यकर्ते स्मृतीशेष एन डब्ल्यू गायकवाड यांच्या स्मृतिदिना निमित्त बौध्द स्मशानभूमी मध्ये बोधिवृक्षा चे वृक्षारोपण कार्तिक पौर्णिमेचे औचित्य साधून करण्यात आले.

याप्रसंगी भंते पया वंश, रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश जी कांबळे, माजी उपनगराध्यक्ष न प गटनेते उत्तम भैय्या खंदारे, आरोग्य सभापती एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड, रेल्वे कामगार नेते अशोक कांबळे, विजय जोंधळे, शाहीर गौतम कांबळे यांची उपस्थिती होती.

वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप गायकवाड, गौतम वाघमारे, दिलीप कांबळे संजय गायकवाड श्रीकांत हिवाळे सुबोध खंदारे सिद्धार्थ भालेराव बाळू गायकवाड आदींनी परिश्रम घेतले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या