💥परभणी जिल्ह्यातील इयत्ता ९ वी व ११ वीचे वर्ग सोमवार दि.२१ डिसेंबर पासून सुरू होणार....!


💥जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली प्रसार माध्यमांना माहिती💥

परभणी (दि.१६ डिसेंबर) - जिल्ह्यातील शाळांमध्ये इयत्ता ९ वी व ११ वीचे वर्ग येत्या सोमवार दि.२१ डिसेंबर २०२० पासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

महानगर पालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील शाळांतील दहावी व बारावीचे वर्ग २ डिसेंबर २०२० पासून तर महानगर पालिका क्षेत्रातील १० डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आले. सर्व शाळांनी कोविड-१९ बाबत काळजी घेत शाळांना प्रारंभ केला. विशेष म्हणजे पाल्यास शाळेत पाठविण्याबाबत पालकांचे पत्रही शाळांनी घेतले. त्याशिवाय शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरता सॅनिटायझर मशीनची, मास्क आणि दोन विद्यार्थ्यांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राखत शाळांनी शैक्षणिक कामकाज सुरू केले. याच पार्श्वभुमीवर आता येत्या २१ डिसेंबरपासून म्हणजेच सोमवार पासून इयत्ता नववी व अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी दिले. सर्व शाळांनी कोविड-१९ च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शाळा सुरूळीत सुरू झाल्या आहेत. इयत्ता दहावी व बारावीचे वर्गांतून विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून येत आहे. शाळांना भेटी देऊन पाहणी केली, विद्यार्थ्यांशी संवादही साधला आहे. याच पार्श्वभूमीवर नववी व अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. शाळांनी सॅनिटायझिंग करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना मास्कबाबत अग्रही ठेवण्यासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. दहावी, व बारावीतील शाळांसह विद्यार्थ्यांचा यास प्रतिसाद मिळत असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ यांनी म्हटले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या