💥परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलिस प्रशासनाने पकडला ५४७ पोते शासकीय स्वस्त धान्यातील तांदूळाचा साठा...?


💥जप्त केलेल्या तांदळाची माहिती महसूल विभागास देण्यात आली असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजते💥

परभणी (दि.१७ डिसेंबर) - जिल्ह्यात शासकीय स्वस्त धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले असून आज गुरूवार दि.१७ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास दैठणा पोलिस प्रशासनाने तब्बल ५४७ पोते शासकीय स्वस्त धान्यातील तांदूळ घेऊन जाणारा ट्रक ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई केली असून ताब्यात घेतलेल्या तांदळाची माहिती महसूल विभागास देण्यात आली असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजते. 

जिल्ह्यातील दैठना परिसरातून एका ट्रकमधून राशनच्या तांदळाची मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असल्याची माहिती दैठणा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी गंगाखेड - परभणी रस्त्यावर सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक आदोडे,कर्मचारी काशिनाथ मुलगीर,कांबळे,कुरेशी,पवार यांच्यासह या फौजफाट्यासह पो.नि.पाडाळकर हे रोडवर थांबले असता एक ट्रक भरधाव वेगाने जाताना त्यांना दिसला.भरधाव जाणार्‍या एमएच - २६ एडी १७६५ या ट्रकला दैठणा पोलिसांनी थांबवले ट्रकचालकाची चौकशी केली असता त्याने शेख अन्सार शेख अफसर रा.पालम असे नाव सांगीतले. ट्रकमध्ये २७ टन तांदूळ असल्याचे त्याने म्हटले मात्र तांदळाच्या बिलाची पावती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगीतले. तसेच मालाबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. गुजरातला आपण हा माल नेत असल्याचे त्याने सांगीतले. यावेळी मालाची पाहणी केली असता त्यात ५४७  पोते तांदूळ आढळला असून तो राशनचा असावाअशी शक्यता असल्याने तो ट्रक पोलिसांनी दैठणा पोलिस स्थानकात आणून लावला. याबाबत पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर यांनी महसूल विभागास याची माहिती दिली असल्याचे पो.नि.पाडाळकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या