💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातल्या खतगाव फाट्यावर विशेष पथकाने अवैध देशी दारूसह दोघांना घेतले ताब्यात...!


💥विशेष पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत दुचाकी वाहनासह १ लाख १४ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त💥

परभणी (दि.१३ डिसेंबर) -जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांच्या आदेशानुसार काल शनिवार दि.१२ डिसेंबर २०२० रोजी सायं.७-४० वाजेच्या सुमारास विशेष पथक जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून केसेस करणे कामी गेले असता विशेष पथकाला गंगाखेड पोलिस स्थानकाच्या हद्दीतील मौ.मन्नाथ परिसरात पोहोचले असता गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती मिळाली की दोन इसम एका मोटारसायकलवर निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये विनापरवाना व चोरटी विक्री करण्यासाठी अवैध दारू घेऊन जात आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावर खतगाव फाट्यावर सहाय्यक उपनिरिक्षक चंद्रकांत पवार व विश्वास खोले यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकातील सहकारी कर्मचारी सुग्रीव केंद्रे,नीलेश भुजबळ,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने,शंकर गायकवाड़,अजहर पटेल,विष्णु भिसे,जमीर फारुखी यांनी मोटारसायकलसह दोन इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे ९६ देशी दारू बॉटल किंमत ४९९२/-रुपयांच्या अवैध दारू साठ्यासह मोटरसायकल किंमत १,१०,०००/-रुपये असा एकून १ लाख १४ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला सदरील मुद्देमालासह विशेष पथकाने आरोपी विजय विठ्ठल फड,शंभुदेव गंगाराम फड रा.खातगाव तालुका गंगाखेड यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात विशेष पथकातील कर्मचारी विष्णू बालासाहेब भिसे यांच्या फिर्यादी वरून गंगाखेड पोलिस स्थानकात कलम ६५ (ई),८३ म.प्रो.का.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या