💥परभणीत मोबाईलने मटका अन् अक्षरशः बुलटवर भटकंटी करीत मटक्याच्या चिठ्ठ्या देणार्‍या मटका बहाद्दर बुलेटराज्यास अटक..!


💥स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बुलेट मोबाईलसह १ लाख १४ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त💥

परभणी (दि.७ डिसेंबर) - मोबाईलवर मटका ग्राहकांशी संपर्क करत मटका जुगाराचे आकडे घेऊन मटका जुगार खेळणाऱ्यांना बुलेटवर शानने फिरून रस्त्यावर मटक्याच्या चिठ्ठ्या देणार्‍या मटका बहाद्दर बुलेटराजाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रविवार दि.६ डिसेंबर २०२० रोजी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १ बुलेटसह २ मोबाईल हँडसेट असा १ लाख १४ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल स्थागुशाच्या पथकाने जप्त केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बाळासाबेब तुपसमिंदर, हरिश्चंद्र खुपसे, दिलावर खान पठआण, मोबीन शेख, अजहर पठाण हे जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्या आदेशाने व सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनावरून शहरात रविवारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एक व्यक्ती मोबाईलवर मटक्याचे आकडे घेत मटक्याच्या चिठ्ठ्या देत असल्याची माहिती मिळाली. पथकाने रविवारी दुपारी दीडच्या सुमारास जिंतूर रस्त्यावरील दर्गा रोड कमानीजवळ उभे राहून मोबाईलवर मटक्याचे आकडे घेत लोकांना चिठ्ठ्या देत असताना रंगेहात पकडले. यावेळी पोलिस आल्याचे समजताच त्याच्याजवळ उभे असलेले लोक तेथून पसार झाले. मात्र, पोलिसांनी संबधित संशयितास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने सतीश फटके असे नाव सागितले. तसेच तो काद्राबाद प्लॉटमधील अखिल मणियार नामक व्यक्तीसाठी मटका घेऊन मणियार याच्या व्हाट्सअ‍ॅपवर पाठवत असल्याचीही माहिती त्याने पथकास दिली. पथकाने त्याची झडती घेतली त्यावेळी त्याच्याजवळ ६ हजार ६४० रुपये आढळले. त्याच्या जवळ सापडलेल्या पैश्यांसह एमएच २२ एच ३७७५ या क्रमांकाची बुलेट,२ मोबाईल हँडसेट असा एकूण १ लाख १४ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हनुमंत जक्केवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुद्देमालासह संबंधितास कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या