💥पुर्णा शहरात मागील पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा खंडीत,नागरिकांची पाण्यासाठी भटकंती ....!


💥महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर परिषद प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात💥

पूर्णा (दि.११ डिसेंबर) पूर्णा शहरातील नागरीकांना मागील दहा ते बारा दिवस झाले पाणी उपलब्ध होत नाही नगर पालिका प्रशासनाने एक पत्रक काढून नागरीकांना पुढील दहा दिवस पाणी उपलब्ध होणार नाही आहे सांगितले परंतु आज नगर पालिकेने दिलेली मुदत संपली तरी देखील शहरात पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला नाही पुर्णानदी पत्रातील मोटार (जॅकवेल् ) खराब झाल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उशीर होत आहे असे नगर परिषद प्रशासन सांगत आहे.


आज जवळ जवळ पंधरा दिवस झाले नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास  सहन करावा लागत आहे पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील नागरिकांना वन वन भटकावे लागत आहे पुर्णा नदीपात्रातील कोल्हापूरी बंधाऱ्यात पाणीसाठा मुबलक प्रमाणात असतांनाही शहरात ऐन हिवाळ्यात सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाई संदर्भात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

या पाणीटंचाई संदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे तालुकाध्यक्ष गोविंद उर्फ राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने नगर परिषदेचे ओएस नंदलाल चावरे यांच्या मार्फत मुख्याधिकारी पंकज पाटील यांना निवेदन देऊन तात्काळ शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी केली असून अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिव्र आंदोलन छेडेल असा इशारा मनसेच्या वतीने नगर पालिका प्रशासनाला देण्यात आला आहे या निवेदनावर रूपेश सोनटक्के जिल्हाध्यक्ष गोविंद (राज) ठाकर शहराध्यक्ष अनिल बुचाले तालुका अध्यक्ष राजेश यादव उप शहर अध्यक्ष पंकज राठोड उप शहर अध्यक्ष शेख गौस शहर सचिव  पवन बोबडे आदी पदाधिकारी यांच्या साक्षऱ्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या