💥दुरदर्शन वाहिण्यांवरून राज्यातील शाळेच्या वेळापत्रका प्रमाणे विद्यार्थ्यासाठी अध्यापन सुरू करा...!


💥अखील महाराष्ट्र उर्दू संघटनेचे राज्यसचिव शेख जमिर राजा यांनी राज्य शासनाकडे लेखी स्वरूपाप करण्यात आली मांगणी💥                                                

पुर्णा (दि.१ डिसेंबर) राज्यातील विद्यार्थ्यांंना माध्यमनिहाय वर्गवार शिक्षण देण्यासाठी दूरदर्शन वाहिन्या सुरू करून शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे अध्यापन सुरू करा अशी मांगणी अखील महाराष्ट्र उर्दू संघटनेचे राज्यसचिव शेख जमिर राजा यांच्या वतीने राज्य शासनाकडे लेखी स्वरूपात केली आहे.


सध्या कोरोना मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी आपण ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत अनेक प्रयत्न शासनाकडून होत आहे.मात्र ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्शन आणि स्पीड इत्यादी अनेक समस्या असल्याने दीक्षा, यूट्यूब इत्यादी द्वारे शंभर टक्के  विद्यार्थ्यां पर्यंत पाठ पोचत नाहीत. देशात विशेषतः ग्रामीण भागात इंटरनेट पेक्षा दूरदर्शनचा नेटवर्क अधिक चांगला व सोयीचा आहे.ज्या विद्यार्थ्यांच्या घरी दूरदर्शन संच नाहीत असे फार कमी विद्यार्थी आहेत व अशा विद्यार्थ्यांसाठी शाळेकडून शासन व समाजाच्या साहाय्याने विशेष व्यवस्था केली जाऊ शकते. तरी आपण माध्यमनिहाय वर्गवार दूरदर्शन वाहिन्या उपलब्ध करून प्रति दोन वर्गांसाठी एक स्वतंत्र वाहिनी सुरू करावी व शिफ्ट च्या शाळांप्रमाणे सकाळच्या सत्रात एक वर्ग व दुपार च्या सत्रात एक वर्ग ठेवावा म्हणजेच १ ली ते १२ वी साठी मराठी माध्यमाच्या ६ व उर्दू माध्यमाच्या ६ दूरदर्शन वाहिन्या सुरू कराव्या,स्टुडिओ मध्ये काही विद्यार्थी समोर बसवून अगदी वर्गाप्रमाणे नमुना पाठ घेऊन शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे सादर करावे व गृहपाठ सुद्धा देण्यात यावा.ह्या वाहिन्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी क्लासरूम सारखी राहील व वर्ग शिक्षक मेंटरची भूमिका पार पाडतील.,शाळेच्या वेळेत विद्यार्थी आपापल्या घरात दूरदर्शनवर तासिकेत हजर आहेत किंवा नाही हे वर्ग शिक्षक गावात फिरून बघतील व दररोजच्या तासिकांप्रमाणे विद्यार्थ्यांचे गृहकार्य तपासतील आणि प्रत्यक्ष भेट व मोबाईल फोन द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देतील,दिवसा सादर केलेल्या सर्व पाठांचे रात्री पुनर्प्रसारण करण्यात येईल तसेच दूरदर्शन सादर केलेले सर्व पाठ नंतर यूट्यूब प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध करून दिले जातील म्हणजे वेळेत बघू न शकलेले विद्यार्थी आपल्या सोयीने बघू शकतील.अश्या प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवता येईल. दूरदर्शन वाहिन्या फक्त कोरोना काळातच नव्हे तर पुढे नेहमीसाठी सुरू ठेवून शैक्षणिक क्षेत्रात एक मोठा क्रांतिकारक कार्य आपल्या कडून घडून आणावा.निवेदनाच्या प्रतिलिपि महाराष्ट्र राज्याच्या मा.मंत्री,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,आयुक्त(शिक्षण),शिक्षण आयुक्तालय,पुणे.मा.संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे

यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत.निवेदनावर अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनाचे राज्यसचिव शेख जमिर राजा यांची स्वाक्षरी आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या