💥खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषदेच्या वतीने 500 दिव्यांगांना प्रत्येकी 1 हजार रुपये मंजूर...!


💥जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे आभार-डॉ.संतोष मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी नगरपरिषदेच्या वतीने 500 दिव्यांगांना प्रत्येकी हजार रुपये मंजूर करून दिल्याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे दिव्यांग बांधवांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी आभार मानले आहेत.

      देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जाणता राजा खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगर परिषदेच्या वतीने 500 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी एक हजार रुपये मंजूर करून देण्यात आले आहेत. त्यामुळे दिव्यांग बांधवांना कोरोनाच्या संकटात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ.सरोजिनीताई हालगे, न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड, मुख्यधिकारी अरविंद मुंडे तसेच सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांचे दिव्यांग बांधव संघटना व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना आभार मानले आहेत. तसेच सर्व दिव्यांग बांधवांनी आपले आँनलाईन प्रमाणपत्र व बँक पासबुक झेरॉक्स नगर परिषद कार्यालयात जमा करावे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रमुख डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या