💥नागपूर पदवीधर मतदार संघात दुपारी २-०० वाजेपर्यंत 32.92 टक्के मतदान...!💥विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.संजीव कुमार यांनी दिली माहिती💥

नागपूर (दि.1 डिसेंबर) : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज मतदानाच्या दिवशी

विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 12 ते 2  दरम्यान  32.92 टक्के मतदान झाल्याची माहिती

विभागीय आयुक्त  तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

            दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये 35.15 टक्के पुरुषांनी तर 29.49 टक्के महिला पदवीधर

मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हानिहाय झालेले मतदान नागपूर 28.54 टक्के, भंडारा-

37.69 टक्के, चंद्रपूर-36.89 टक्के, गोंदिया-33.03 टक्के, गडचिरोली-40.54 टक्के, वर्धा-38.84 टक्के

            सकाळी 8 ला आज विभागात मतदानाला सुरुवात झाली. नव मतदारांमध्ये मतदानाची उत्सुकता

दिसून आली. कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून ही  निवडणूक होत आहे. मतदानाची वेळ

सकाळी 8 ते 5 आहे. विभागात 2 लाख 6 हजार 454 मतदार आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या