💥जिंतूरात अवैध वाहतूक करणाऱ्या 28 क्रुझर वर पोलिसांची कारवाई....!


💥वाहन धारकांना न्यायालयापुढे उद्या उभे करण्यात येणार असून न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले सर्वांचे लक्ष💥

प्रदिप कोकडवार

जिंतूर (दि.१५ डिसेंबर) - तालुक्यात लग्न समारंभ सह अनेक कार्यक्रमाला नेहमी अवैध मार्गाने प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या क्रुझर जीपचालका विरुद्ध जिंतूर पोलिसांनी आज धडक कारवाई केली एकूण 28 क्रुझर जीप आज पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नागरगोजे यांनी दिली आहे जिंतूर तालुक्या सह जिल्हाभरात क्रुझर जीप अवैध मार्गाने प्रवाशांची ये जा करीत असते यातच आता लग्नसराईचे दिवस असल्यामुळे या जीप चालकांना मोठ्या प्रमाणात डिमांड आले आहे प्रति किलोमीटर 10 ते 12 रुपये दराप्रमाणे ही वाहने लग्नाची व्हराडी मंडळी ने आन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात अनेक वेळा एका तिथीला अनेक लग्न असल्यास या जीप चालकांची मनमानी मोठ्या प्रमाणात दिसून येते  परंतु नाईलाजाने लग्न घरातील मंडळी या जीप ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवत असतात.

 आज पोलिस उपाधीक्षक श्री श्रवण दत्त आणि पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नागरगोजे यांनी ही धडक कारवाई केली आहे दरम्यान या कारवाईमुळे आज दिनांक 15 डिसेंबर उद्या 16 डिसेंबर दोन दिवसाचे भाडे बुडेल आणि प्रति वाहन किमान दोन हजार रुपये दंड लागेल तो वेगळा अशी शक्यता वर्तविली जात आहे या सर्व वाहने तालुका  न्यायालयापुढे उद्या उभे करण्यात येणार असून त्यांना प्रत्येकी किती रुपयांचा दंड लागतो याकडे आता लक्ष लागले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या