💥परभणी जिल्ह्यात आज सोमवारी दि.३० नोव्हेंबर रोजी आढळले ३० कोरोना बाधीत रुग्ण....!


💥जिल्ह्यात आज सोमवारी उपचारा दरम्यान २ कोरोना बाधीतांचा दुर्दैवी मृत्यू💥

परभणी (दि.नोव्हेंबर ३०) - शहरासह जिल्ह्यात आज सोमवार दि.३० नोव्हेंबर रोजी ३० कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने आज कोरोनाने पुन्हा एकदा रिकॉर्ड ब्रेक केल्याचे निदर्शनास येत आहे. तर आज रुग्णालयात उपचार घेऊन बर झालेल्या १० कोरोनामुक्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून जिल्ह्यात आज उपचारा दरम्यान २  कोरोनाबाधित पुरूषांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

कोविड कक्षात भरती एकून रुग्ण १४८ आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत २८९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार १२५ कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून ६ हजार ६८८ कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या