💥परभणी जिल्ह्यात मागील एकदिड वर्षापासून नकली नोटांचा काळा कारभार चालवणारी टोळी विशेष पथकाने घेतली ताब्यात...!

 


 💥विशेष पथकाच्या कारवाईत ९ हजार ६०० रुपयांच्या नकली नोटांसह २९ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५ आरोपी ताब्यात💥

परभणी (दि.१ डिसेंबर) परभणी  जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक श्री जयंत मिना आदेशाने व अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक श्री मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाने काल सोमवार दि.३० नोव्हेंबर २०२० रोजी गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहिती वरून विशेष पथकाने रात्री १०-०० वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील दैठना पोलिस स्थानकाच्या हद्दीतील पोखर्नी फाटा परिसरातील मौ.वडगाव सुक्रे गावातील बसस्टँड येथील सार्वजनिक रस्त्यावर भारतीय चलनातील दोनशें रुपयांच्या नकली नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नातील तिघा आरोपीतांना ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई केली. 


यावेळी नमूद तिन्ही आरोपीतांकडून तब्बल ९ हजार ६०० रुपयांच्या दोनशें रुपयांच्या ४८ नकली नोटा आढळून आल्या यावेळी विशेष पथकाचे कर्तव्यकठोर पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार यांनी पोलिसी खाक्या दाखवताच संबंधित घटनेतील तिन्ही आरोपींनी पोपटा प्रमाणे बोलके होऊन या नकली नोटा माजलगाव येथील दोघांकडून आणल्याचे विशेष पथका समोर कबूल केल्यानंतर विशेष पथकाचे पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार,विश्वास खोले,सहकारी पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने,शंकर गायकवाड़,विष्णु भिसे,दिपक मुदिराज ,धरने या धाडसी पथकाने तात्काळ तपासाची सुत्र हलवत घटनेतील दोन आरोपी मध्यरात्रीच्या सुमारास माजलगाव जिल्हा बिड येथून अटक करून या नकली नोटा प्रकरणात सय्यद फ़ीरोज,मारोती सालुंके,भागवत शिंदे,नुर मोहम्मद हाशम अतार या चौघांसह एक नाबालिक आरोपी राहणार सर्व माजलगाव जिल्हा बिड अश्या ५ आरोपींसह ९ हजार ६०० रुपयांच्या २०० रुपयांच्या ४८ नोटांसह २० हजार रुपयांची जुनी मोटारसायकल असा २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाईस्तव दैठना पोलिस स्थानकाचे पो.नि.पाडळकर यांच्या ताब्यात देण्यात आले असून या संदर्भात दैठना पोलिस स्थानकात विशेष पथकातील पो.ना.राहूल दत्ता चिंचाणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आज मंगळवार दि.१ डिसेंबर २०२० रोजी गुरक्र.२१५/२०२० कलम ४८९ (ब) (क),४२०,१२० (ब) ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दैठना पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरिक्षक आदुडे हे करीत असून विशेष पथकाने ताब्यात घेतलेली बनावट नकली नोटा चलणात आणणारी हि टोळी मागील एक ते दिड वर्षापासूनपरभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात बनावट नकली नोटांचा काळाकारभार चालवत असल्याचे बोलले जात असून या नकली नोट प्रकरणाचा तपास अप्पर पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे दिल्यास मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात बनावट नकली नोटांच्या काळ्या कारभाराचे फार मोठे रॕकेट उघडकीस येण्याची शक्यत वर्तवली जात आहे.दरम्यान परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक श्री जयंत मिना व अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पदभार स्विकारल्या नंतर स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाकडून अवैध धंद्यांच्या विरोधात एकामागून एक होत असलेल्या धाडसी कारवायांमुळे परभणी जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांसह गुन्हेगारी जगतात अक्षरशः दहशतीचे तर सर्वसामान्य जनतेत सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या