💥परभणी जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने केली आंतर जिल्हा चंदन तस्कर टोळी जेरबंद....!


💥विशेष पथकाने आंतर जिल्हा चंन्दन तस्कर टोलीस जेरबंद करीत पोलिस दलाचे नावलौकिक केले आहे💥

परभणी (दि.२९ नोव्हेंबर) - जिल्ह्याचे कर्तव्यकठोर पोलिस अधिक्षक श्री.जयंत मिना यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने आज पुन्हा ऐतिहासिक धाडसी कामगिरी बजावत आज रविवार दि.२९ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ०४-३० वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील रामेटाकळी परिसरात यशस्वी सापळा रचून चंदन तस्करांची आंतर जिल्हा टोळीससह २५ हजार रुपये किंमतीचे १० किलो चंदन,४ जुन्या मोटरसायकल किंमत १ लाख २० हजार रुपयें,चोरट्या चंदनाची तस्करी करण्यासाठी वापरण्यात येणारे चारचाकी टाटा इंडिका कारसह तब्बल २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच विशेष पथकाने आंतर जिल्हा चंन्दन तस्कर टोलीस जेरबंद करीत पोलिस दलाचे नावलौकिक केले आहे.

सविस्तर वृत्त असे की जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या शेतातील चंदणाची झाडे चोरीस जाण्याच्या घटना घडत असून अशीच एक घटना मानवत तालुक्यातील बोंदरवाडी येथील शेतकरी रामेश्वर भागीरथ कबले यांच्या बोंदरवाडी शेत शिवारातील गट नं.११ या शेताच्या धुऱ्यावर असलेले अंदाजे दहा फुट उंचीची २ चंदनाची झाडे किंमत अंदाजे ८ हजार रुपये दि.२५ नोव्हेंबर ते दि.२६ नोव्हेंबर २०२० च्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बुडापासून लोखंडी करवतीच्या साहाय्याने कापून नेल्याची घटना घडली होती या संदर्भात रामेश्वर कबले यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधात आज दि.२९ नोव्हेंबर २०२० रोजी गु.र.नं.२३३/२०२० कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता जिल्ह्यात चंदण चोरी करून त्या चोरट्या चंदणाची तस्करी करणारी एखादी टोळी तर संक्रीय झाली नाही ना ? या प्रश्ना मुळे प्रश्नांकीत मुद्रेत असलेल्या पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखालील पो.कॉ. सुग्रीव केंद्रे,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने ,शंकर गायकवाड़,विष्णु भिसे,दिपक मुदिराज या पथकाने अत्यंत यशस्वी सापळा रचून आज शनिवारी आरोपी भिमा लक्ष्मण गायकवाड रा.हारळवाडी ता.मोहळ जिल्हा सोलापूर,बप्पा नामदेव माने रा.ता.जामखेड जिल्हा अहमदनगर,नवनाथ कल्याण माने  रा.माऊलीनगर ता.पाटोदा जि.बिड,सतिश निवृत्ती जाधव रा.कोरेगाव ता.कर्जत जि.अहमदनगर,अक्षय नवनाथ माने रा.माऊलीनगर पाटोदा जि.बिड,संतोष जालंधर माने रा.माऊलीनगर पाटोदा जि.बिड,लक्ष्मण गोरख जाधव रा.दहिवंडी ता.शिरोड जि.बिड,सोनाजी देवराव जाधव रा.पाडळी ता.शिरोट जि.बिड,भारत भाऊराव जाधव रा.दहिवंडी ता.शिरोड जि.बिड या आंतर जिल्हा चंदन तस्करांच्या टोळीस जेरबंद केले आहे....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या