💥परभणी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा विमोड करण्यासाठी पोलिस प्रशासनाला आवश्यकता तिसरे नेत्र उघडण्याची....!



💥जिल्ह्यातील प्रत्येक शहरात बसवण्यात आलेले सिसीटिव्ही कॅमेरे करताय खाकी वर्दीतील आधुनिक महादेवाच्या तिसऱ्या नेत्राचे काम💥

💥'शोध आणि बोध'- चौधरी दिनेश (रणजीत)

परभणी जिल्ह्याच्या जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व अत्यंत कर्तव्यकठोर नुतन जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.जयंत मिना यांनी स्विकारल्यानंतर प्रथमतःच जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे साम्राज्य स्थापीत करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीत मात्र प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण होऊन गुन्हेगारी प्रवृत्ती हळुवारपणे हद्दपारीच्या दिशेने पावल टाकतांना दिसत आहे.


परभणी जिल्ह्यात अवैध व्यवसायांतून मिळणाऱ्या अमाप पैश्यासह राजकीय वरदहस्ताच्या बळावर प्रचंड प्रमाणात फोफावलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा विमोड होणे जितके गरजेचे आहे त्याच प्रमाणे राजकीय सुड भावनेतून निरपराधांना गुन्हेगार बनवून या अल्पबुध्दीच्या तथाकथित गुन्हेगारांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेणाऱ्या गुन्हेगारीच्या खादीआड दडलेल्या 'परभणी पॅटर्न' च्या काही दळभद्री निर्मात्यांचा विमोड होणे ही तितकेच आवश्यक आहे.किरकोळ स्वरूपाच्या भांडणांना पाहता पाहता जातीय दंगलीचे स्वरूप देऊन दंगल सदृष्य परिस्थिती कशी निर्माण होईल आणि कश्या पध्दतीने प्रतिस्पर्धी राजकारण्यांच्या आधारावर नाईलाजास्तव आपल्या भविष्याचा शोध घेणाऱ्या निरपराधांच्या नावाच्या याद्या तय्यार करून हेच दंगलीलीला जवाबदार असल्याचे प्रशासनाला भासवून अरदकच्च्या गुन्हेगारांची निर्मिती करणाऱ्या व या अरदकच्च्या तथाकथित गुन्हेगारांच्या माध्यमातून आपल्या अवैध धंद्यांचे सुत्र हलवणाऱ्या 'परभणी पॅटर्न' सिनेमाचा शेवट स्वतःच्या कर्तृत्वाने करण्यासाठीच कदाचित इश्वराने जिल्ह्याचे कर्तव्यकठोर सर्वसामान्यांचे हित जोपासणारे जनहीतवादी 'अस्सल सिंघम' जिल्हा पोलिस अधिक्षक आयपीएस जयंत मिना आणी अप्पर पोलिस अधिक्षक आयपीएस श्री मुमक्का सुदर्शन यांना जिल्ह्यात पाठवले तर नसेल ना ? असा प्रश्नच आता जिल्ह्यातील सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.


परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार जयंत मिना यांनी स्विकारल्यानंतर ज्या प्रमाणे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मनात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच प्रमाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात दहशतमुक्त वातावरणाची निर्मिती होतांना पाहावयास मिळत असून त्यांनी जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाची प्रतिमा सर्वसामान्य जनतेत विश्वासाची कश्या पध्दतीने होईल या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात केली असून,जिल्ह्यातील प्रत्येक शहरातील चौका चौकात आता अत्यंत  आधुनिक पध्दतीचे सिसीटिव्ही कॅमेरे स्थानिक प्रशासनाकडून बसविण्यात येत असून हे सिसीटिव्ही कॅमेरे 'खाकी वर्दीतील आधुनिक महादेवाच्या तिसऱ्या नेत्राचे काम निश्चितच करणार असून या सिसीटिव्ही कॅमेऱ्यांमुळे पोलिस प्रशासनाला प्रत्येक घटनेतील 'सत्य-असत्याची' पडताळनी करणे अत्यंत सोपे जाणार आहे'.  

परभणी जिल्ह्यातील अत्यंत संवेदन तालुका म्हणून शासकीय दफ्तरी नोंद असलेल्या पुर्णा शहरातही असे अत्यंत अत्याआधुनिक पध्दतीचे तब्बल ३५ 'सिसीटिव्ही कॅमेरे' प्रशासनाने नुकतेच बसवल्याचे निदर्शनास येत असून ही अत्यंत कौतुकास्पद आणि सर्वसामान्य जनतेच्या हितावह बाब म्हणावी लागेल अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या पुर्णा शहरातील सर्वात जास्त आर्थिक उलाढाल होणाऱ्या सोने-चांदीची व्यापारपेठ असलेल्या सराफा बाजार परिसरात संत नरहरी महाराज चौक (डॉ.जहागीरदार चौक),शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक,जामा मस्जीद लगत असलेल्या महात्मा बसवेश्वर चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,स्वामी दयानंद सरस्वती चौक,रेल्वे स्थानक परिसर-नगर परिषद-भगवान महाविर नगर परिषद लगत असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद चौक आदी ठिकाणी 'सिसीटिव्ही कॅमेरे' बसवने काळाची गरज होती आदींसह शहरातील विविध भागात नगर परिषद प्रशासनाने  'सिसीटिव्ही कॅमेरे' बसवण्याचे काम केलेले दिसत आहे सदरील 'सिसीटिव्ही कॅमेरे' दंगलसदृष्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासह परिसरात घडलेल्या विविध गुन्ह्यांच्या दोन्ही बाजूने तपास लावण्यात पोलिस प्रशासनाला मोलाचे सहकार्य करणार असल्याने हे 'सिसीटिव्ही कॅमेरे' खाकी वर्दीतील आधुनिक महादेवाच्या तिसऱ्या नेत्राचे काम करणार असून प्रत्येक घडलेल्या गुन्ह्यात फिर्याद देणारा कितीपट खरे बोलतोय आणि आरोपी गुन्हा करून आपल्या गुन्ह्यावर कश्या पध्दतीने पडदा टाकण्याचा प्रयत्न करतोय याचा शोध घेणे पोलिस प्रशासनाला अत्यंत सोपे जाणार असल्याने प्रत्येक गुन्ह्यात दोन्ही बाजुंनी तपास करण्यात पोलिस प्रशासन मजल मारणार असल्याने पोलिस प्रशासन या तिसऱ्या नेत्राचा वापर कश्या पध्दतीने करणार हे त्यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असले तरीही फिर्यादी खोटा बोलतोय की आरोपी याचा उलगडा निश्चितच होणार आहे यात ताळमात्र शंका नाही.

पुर्णा शहरासह तालुक्यात स्वतःच कायदा हातात घेऊन कुठल्याही प्रकारचा मद्य प्राशन करण्याचा परवाना नसतांना यथेच्छ मद्याचे प्राशन करून अनेक मद्यपींकडून न्यायदेवता झाल्या प्रमाणे न्याय निवाडा करण्याचे प्रमाण वाढले आहे अश्या वेळी संबंधित मद्यपी स्वयंघोषीत न्यायायदेवताच्या आवेशात स्वतःच पडून जखमी होतोय की समोरच्या व्यक्ती सोबत झालेल्या बाचाबाचीत जखमी होतोय याचा उलगडा करणे पुर्वी अवघड जात होते परंतु शहरात बसवण्यात आलेल्या सिसीटिव्ही कॅमेऱ्यातील पुटेज मुळे याचा शोध घेणे सुध्दा सोपे जाणार असल्यामुळे आता प्रत्येक गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका शहर पातळीवर संबंधित गुन्ह्यांच्या तपासिक अंमलदाराने (आयओ) स्थानिक पातळीवर सिसीटिव्ही कॅमेऱ्यातील पुटेजचा वापर करावा ज्याने करून निरपराध अपराधी व अपराधी निरपराध होण्यापासून रोखता येतील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत असल्याने जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक श्री जयंत मिना यांनी तसे लेखी स्वरूपात आदेश सुध्दा स्थानिक पोलिस प्रशासनाला द्यावेत अशी मागणी आता जनसामान्यांतून होतांना दिसत आहे....

- 'शोध आणि बोध' - चौधरी दिनेश (रणजीत)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या