💥परभणी जिल्ह्यात कोरोना महामारीत कोरोना बाधीतांना जिवणदान देण्यासाठी धडपडणारा कोरोना योध्द्याचा मृत्यू...!


 💥चोवीस वर्षीय तरूण डॉक्टरचा कोरोनाने घेतला बळी💥 

परभणी (दि.०४ सप्टेंबर) परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण काळात वैद्यकीय सेवा बजावणार्‍या एका २४ वर्षीय तरुण कोरोना योद्धा डॉक्टरचा आज शुक्रवार दि.०४ सप्टेंबर रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना वैद्यकीय सेवा देणार्‍या जिंतूर रस्त्यावरील विकासनगरातील या तरुण डॉक्टरास कोरोनाची लागण झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.आज शुक्रवारी सकाळी या डॉक्टरचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान तालुक्यातील पिंगळी येथील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुत्रांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या