💥परभणी जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांतील कोव्हिड बिलाबाबत तक्रारी नोंदविण्याचे प्रहार पक्षाचे आवाहन..!


💥शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणेच सर्व खाजगी कोव्हिड रुग्णालयांनी रुग्णावर उपचार करावेत💥

परभणी (दि.९ सप्टेंबर) - जिल्हयामध्ये वाढत्या कोव्हिड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने काही खाजगी रुग्णालयांना कोव्हिड रुग्णालय माणून मान्यता दिलेली आहे. या संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार प्रत्येक खाजगी कोव्हिड रुग्णालयांनी कोव्हिड रुग्णांच्या उपचारासाठी आकारल्या जाणाऱ्या बिलाबाबत एक दरपत्रक निश्चित केले. या निश्चित केलेल्या दराप्रमाणेच सर्व खाजगी कोव्हिड रुग्णालयांनी रुग्णावर उपचार करावेत तसेच संबंधीत दरपत्रक आपल्या रुग्णालयाबाहेर लावणे बंधनकारक केले आहे. 

परभणी जिल्हयातील काही खाजगी कोवीड रुग्णालय कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दरपत्रकापेक्षा अधिकचा दर आकारुन रुग्णांना अतिरिक्त बिल देत आहेत. या बाबत काही तक्रारी प्रहार जनशक्ती पक्ष परभणीकडे आल्या असून त्या पार्श्वभूमीवर मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या पुढाकाराने सोशलमिडीयाच्या माध्यमातुन एक हेल्पलाईन सुरु केली.प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांचे मोबाईल नंबर जाहिर करुन ऑनलाईन मदत केंद्र सुरु केल्या गेले आहे. तरी जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की,  जिल्ह्यातील खाजगी कोव्हिड रुग्णालयाकडून आकारल्या गेलेल्या अतिरिक्त बिलाबाबत तक्रार असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर बिलासह लेखी तक्रार करावी. संबंधीत तक्रार प्रशासन पातळीवर मार्गी लावून संबंधीतांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने न्याय मिळुन दिला जाईल. तसेच जे खाजगी कोव्हिड रुग्णालय शासनाने निर्धारीत करुन दिलेल्या दरपत्रका व्यतिरिक्त अधिकचा दर आकारतील. अशा रुग्णालयाकडुन रुग्णांना आकारण्यात आलेल्या अतिरिक्त रक्कम परत मिळवुन देण्याबाबत प्रयत्न करणार आहेत. तक्रार करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या खालील मोबाईल नंबरवर बिलासहलेखी तक्रार करण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे . शिवलिंग बोधने,जिल्हा प्रमुख ( ९८९०१९५१८५ ) गजानन शिंदे, शहर प्रमुख ( ९८३४५२३६८८ ) रामेश्वर पुरी, शहर चिटणीस ( ९४२०१९५१३१ ) राहुल साळुंके, उपशहर प्रमुख ( ८९७५९२१२८८ ) गजानन चोपडे, तालुकाप्रमुख युवा आघाडी ( ८९७५२७९५९८ ) दत्ता गरुड उप शहर प्रमुख युवा आघाडी ( ८९९९७१०९८५ ) अंकुश गिरी, मिडीया प्रभारी ( ९१५८७०३१०३ ) वैभव संघई, उप शहर प्रमुख युवा आघाडी ( ८९९९८२७६९८ )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या