💥आठवण संपर्क अभियानाच्या पहिल्या टप्प्याची ईसाद येथे सांगता...!


💥तालुक्याचे ४१ कोटी रूपये आणनारच   - गोविंद यादव ▪️
गंगाखेड : २०१८ च्या खरीप हंगामात पडलेल्या कोरड्या दुष्काळातील थकीत अनुदान मिळविण्यासाठी गंगाखेड तालुक्यात आठवण संपर्क अभियान राबवण्यात आले. या अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आज ईसाद येथे करण्यात आला. जवळपास ५५ गावांना भेटी देण्यात आलेले हे अभियान म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काची सर्वपक्षीय लोकचळवळ असून या माध्यमातून तालुक्याचे ४१ कोटी रूपये मिळवूच, असा विश्वास या प्रसंगी बोलताना कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी व्यक्त केला. 

ईसाद येथील सर्वपक्षीय शेतकरी संवाद बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते अंकुशराव भोसले हे होते. जि. प. सदस्य किशन धर्माजी भोसले, अभियानाचे प्रवर्तक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष डीगू आबा सातपुते, माजी ऊपसभापती रामप्रसाद सातपुते, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, सुशांतभैय्या चौधरी, माजी जि. प. सदस्य श्रीकांत भोसले, ऊद्धवराव सातपुते, भगवानदादा भोसले, राजेभाऊ सातपुते, माजी सरपंच सिद्धार्थ भालेराव आदिंसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची या प्रसंगी ऊपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना किशन धर्माजी भोसले यांनी शेतकरी आणि गावांच्या विकासासाठी अशा पक्षविरहीत चळवळींची आवश्यकता असल्याचे सांगीतले. सुशांत चौधरी यांनी या अभियानामुळे बऱ्याच नवीन गोष्टी शिकल्याचे सांगून यापुढेही असे अभियान राबवणार असल्याचे सांगीतले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असला तरी यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे. यामुळेच हे अनुदान मिळणारच असून ते प्राप्त केल्याशिवाय हे अभियान थांबणार नसल्याचे गोविंद यादव यांनी स्पष्ट केले. तर अध्यक्षीय समारोपातून डीगू आबा सातपुते यांनी सर्वपक्षीय नेते- कार्यकर्त्यांनी या अभियानात सहभागी होवून ही लोकचळवळ यशस्वी करावी, असे आवाहन केले.

गावातील भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व ग्रामदैवत हनुमान पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियानाचे मुख्य प्रवर्तक रामप्रसाद सातपुते यांनी सुत्रसंचालन आर डी भोसले यांनी तर आभारप्रदर्शन विठ्ठल सातपुते यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या